शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील वळणरस्त्यावरील चौक ठरताहेत ‘मृत्यूचे सापळे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:04 IST

शहादा : शहरातील डोंगरगाव आणि मोहिदा चौफुली नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत़ मंगळवारी मोहिदा चौफुलीवर अपघातात पती-पत्नी जखमी झाले ...

शहादा : शहरातील डोंगरगाव आणि मोहिदा चौफुली नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत़ मंगळवारी मोहिदा चौफुलीवर अपघातात पती-पत्नी जखमी झाले होते़ यातील जखमी पतीचा उपचारदरम्यान बुधवारी मृत्यू झाल्याने दोन्ही चौकांची समस्या ऐरणीवर आली आहे़सेंधवा ते विसरवाडी हा नवीन महामार्गाचे रुंदीकरण सध्या शहादा शहरात सुरू आहे़ जुन्या वळणरस्त्याचे रुंदीकरण केल्याने उंची वाढली आहे़ एकीकडे विकास सुरू असताना दुसरीकडे उंच झालेल्या रस्त्यामुळे महामार्गावर येताना वाहनच दिसत नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे़ शहादा तालुक्यातील उत्तर आणि पूर्व भागातील गावांना जोडणारे रस्ते प्रामुख्याने महामार्गाच्या पलीकडे आहेत़ या चौफुलीच्या चहूबाजूने रहिवासी वसाहती आणि शाळांची उभारणी झाली आहे़ महामार्गाची उंची वाढल्याने हा चौक असमतोल झाल्याने दरदिवशी अपघात होत आहे़वाहनधारक रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असतानाच हे अपघात होत आहेत़ रुंदीकरणामुळे वाहनांचा वेग हा ताशी १०० ते १२० पर्यंत राहत असल्याने गेल्या दोन वर्षात आठ जणांना जीव गमावावा लागला आहे़ मंगळवारी रस्ता ओलांडत असतानाच पाडळदा येथील मोहन तुकाराम पाटील यांच्या दुचाकीला पपई वाहून नेणाऱ्या ट्रकने थेट धडक दिल्याने पत्नी अनितासह मोहन पाटील हे लांबवर फेकले जाऊन जखमी झाले होते़ त्यांचा धुळे येथे उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला़या घटनेमुळे नागरिकांनी गांभीर्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली आहे़