शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

कोरोनाच्या भितीने धरली शेताची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बलवंड : कोरोनाचा संसर्ग होवून अपाय होवून नये यासाठी दक्षता म्हणून प्रशासन उपाययोजनांना वेग देत आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कबलवंड : कोरोनाचा संसर्ग होवून अपाय होवून नये यासाठी दक्षता म्हणून प्रशासन उपाययोजनांना वेग देत आहे़ यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने वेगळे मार्ग धरले असून यात गावापेक्षा शेतात राहण्यास पसंती दिली जात आहे़ शतकापूर्वी आलेल्या रोगाच्या साथीला लांब ठेवण्यासाठी हीच पद्धत अवलंबल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून पूर्व भागातील १० गावांमधील ७५ टक्के नागरिक शेताकडे निघून गेले आहेत़नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भागातील बलवंड, रजाळे, सैताणे, खर्दे खुर्द आणि वैंदाणे या गावांमधील ग्रामस्थ गेल्या आठ दिवसांपासून शेतशिवारातील झोपड्या करुन मुक्काम करत आहेत़ ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर उपाययोजना म्हणून ग्रामस्थ शेतशिवारात राहणे पसंत करत आहेत़ या भागातील बहुतांश शेतकऱ्यांच्या मुक्काम करण्यालायक झोपड्या किंवा छोट्या आकाराची घरे शेतात आहेत़ याठिकाणी पाण्याची सोय असल्याने ग्रामस्थ निवासासाठी निघून गेले आहेत़ याठिकाणी कोणीही येणे शक्य नसल्याने सुरक्षित अशीच स्थिती राहणार असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़ दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून पूर्व भागातील इतर गावांमधील ग्रामस्थ घरातील शिधा घेऊन शेतात जात आहेत़ काहींकडून तात्पुरत्या झोपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे़ तर काहींनी बैलगाडी आणि चारचाकी इतर वाहनांमधून गरजेचे संसारोपयोगी साहित्य शेतातील घरांमध्ये नेत आहेत़ ग्रामीण भागात यापूर्वीही १८ व्यात शतकात आलेल्या रोगराईची साथ आणि दुष्काळावेळी पाण्याची गरज म्हणून ग्रामस्थांनी शेतशिवारात स्थलांतर केल्याचे दाखले ज्येष्ठ ग्रामस्थ देत आहेत़शेतशिवारात रात्री अपरात्री मुक्काम करणे धोक्याचे असल्याची माहिती असल्याने रात्रीच्यावेळी घरातील युवक आणि कर्ते पुरुष आळीपाळीने राखणदारी करुन कुटूंबांचे रक्षण करत आहेत़ अद्यापही पूर्व भागातील गावांमधील शेतकरी शेतशिवारात निवासासाठी जाण्याच्या तयारीत असून त्यांच्याकडून तशी सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान शेतशिवारात राहणाºया या शेतकºयांच्या सुरक्षेसाठी आरोग्य विभागाचे पथकही त्यांना भेटी देऊन वेळोवेळी त्यांची चौकशी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कार्यवाही सुरु आहे़

पूर्व भागातील गावांमध्ये गेल्या हंगामात पावसाने चांगली साथ दिल्याने शेतशिवारात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात शेतात भरपूर कामे होती़ रब्बी हंगाम संपला असला तरी बºयाच ठिकाणी शेतीकामे बाकी आहेत़ या कामांसाठी मजूर येत नसल्यानेही अडचणी येत होत्या़ यावर मात करत शेतकºयांनी कोरोनातूनही मार्ग काढत कुटूंबासह शेताची वाट धरली आहे़ रजाळे ते सैताणे आणि खर्दे खुर्द परिसरातील १५० च्या जवळपास शेतकरी कुटूंबांसह शेतांमध्ये मुक्कामी आहेत़ याठिकाणी संपूर्ण कुटूंब शेतशिवारातील कामांसह इतर अनेक बाबींकडे लक्ष देत आहेत़ बºयाच घरांमध्ये लहान मुले असल्याने त्यांना संसर्ग होवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुटूंबातील महिलांकडून देण्यात येत आहे़