शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ससप्रमुळे नंदुरबार जिल्ह्यातून परिक्रमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरातमध्ये बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्प बांधण्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदेची परिक्रमा होत नव्हती. हे प्रकल्प ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरातमध्ये बांधलेल्या सरदार सरोवर प्रकल्प बांधण्यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातून नर्मदेची परिक्रमा होत नव्हती. हे प्रकल्प बांधल्याने पाण्याचा फुगवटा वाढत परिक्रमा मार्गाचे क्षेत्रफळही वाढले. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातून परिक्रमेला सुरुवात झाली. या मार्गावर उभारलेल्या आश्रमांमध्ये नर्मना जयंतीनिमित्त अनेक उपक्रम होणार आहे.धार्मिकदृष्ट्या नर्मदा परिक्रमेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सर्वात मोठी परिक्रमा म्हणूनही ओळख निर्माण झाली आहे. ही परिक्रमा तीन हजार ५०० किलो मिटर पेक्षा अधिक असल्याचे म्हटले जाते. नद्यांमध्ये श्रेष्ठ नदी म्हणून गंगेचे महत्त्व असले तरी दक्षिण व उत्तर तटावरून गोलाकार वाहत असल्याने केवळ नर्मदा नदीचीच परिक्रमा होत असून तिच्या काठावरुपन केलेल्या गोल प्रदक्षिणेला नर्मदा परिक्रमा म्हटले जात आहे.नर्मदा ही मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्यांतून वाहत असली तरी या नदीचा काही भाग महाराष्टÑातही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा या नदी काठाशी मोठा संबंध येतो. व प्रश्चिम वाहिन्या नद्यांपैकी प्रमुख नदी असली आहे. अमरकंटक (मध्यप्रदेश) शिखरातून तिचा उगम पावत ती सातपुडा व विंध्य पर्वतरांगेतून वाहत आहे. ही नदी अरबी समुद्रास मिळत असून नर्मदा नदीस उत्तर आणि दक्षिण भारताची सीमारेषाही मानली जात असल्याने या नदीचे धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्वही आहे. महाभारत आणि रामायणात ती रेवा या नावाने ओळखली जाते.नर्मदेची परिक्रमा करणाऱ्यांना तीन-चार महिने लागतात. घनदाट जंगल असल्याने परिक्रमा करणाºया भाविकांना बरे-वाईट अनुभव येत आहे. परंतु त्यांना निसर्गरम्य वातावरणाचा सुखद आनंदही लाभत आहे. परिक्रमा करणाऱ्यांना नैसर्गिक व ताज्या फळांचाही आस्वाद घेता येत आहे. ही परिक्रमेला मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक महत्व आहे. परिक्रमा करण्याचा संकल्प केल्यास मानसिकदृष्ट्या कणखर व्हावेच लागते. बहुतांश परिक्रमावासी एकदा चालायला सुरुवात केल्यावर मागे वळून पाहायचे नसल्याचा निश्चयच करीत आहे.या मार्गावर ठिकठिकाणी सुंदर आश्रम, धर्मशाळा असे सर्व लागत होते. कधी आश्रमात, कधी धर्मशाळेत राहणे, तिथे मिळेल ते खाणे हा रोजचा दिनक्रम झाला होता. रात्रीची जागा मिळेल तिथे, अंधारात, मंदिरात, उघड्यावर मुक्कामी थांबावे लागते. असे असले तरी परिक्रमाच्या मार्गावर ठिकठिकाणी काही स्वयंसेवी संस्थांमार्फत या भाविकांसाठी निवास व भोजनाची सुविधा करण्यात आली आहे. नर्मदेमुळे सातपुडा व विंध्य पर्वतातील भाग निसर्गाने समृद्ध केला आहे. काही ठिकाणी परिक्रमा मार्ग शेतातूनही जात आहे. परिक्रमा करणाºयांसाठी महाराष्टÑात भोमशा, सादरी, भमाणे, सावºया बिलगाव, राजबर्डी, रोहजरी, धडगाव, सुरवाणी, कुंडल, खुंटामोडी, काठी, मोलगी, बिजरीगव्हाण, सुरगस, मोकसफाटा, वडफळी येथे निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्या-त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी हे भाविकांचा प्रयत्न असतो.पुणे आळंदी येथील दंडवत बाबा यांनी दि.१८ आॅक्टोबर २०१८ रोजी नर्मदा उगमस्थान अमरकंटकपासून दंडवत नर्मदा परिक्रमा सुरु केली होती. ही परिक्रमा त्यांनी लागोपाठ दोन वर्ष चालू ठेवली.पहिली परिक्रमाही ओंकारेश्वरपासून चालू केली ती पूर्ण झाल्यानंतर दुसरी परिक्रमा ही अमरकंठकपासून सुरु केली आहे. परमपूज्य दंडवत बाबा हे नर्मदा परिक्रमा ही आपल्या नावाप्रमाणेच दंडवत करीत पूर्ण करण्यासाठी निघाले आहेत. धडगाव शहरात पोहचण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले. त्यांनी खूप मोठमोठ्या दºया खोºयासह नदी-नाल्यातून ही दंडवत नर्मदा परिक्रमा त्यांना करावी लागली. धडगाव शहरात पोहचण्यासाठी दंडवत बाबा यांना एक वर्ष एक महिना पूर्ण इतका कालावधी घालवावा लागला आहे. त्यांची दंडवत यात्रा ही पूर्ण तीन वर्षाची असून ते एका दिवसाला केवळ चार किलोमिटर दंडवत परिक्रमा करीत आहे. त्यांच्यासोबत तीन सेवेकरीही आहे.४धार्मिकच नव्हे तर शारिरिक आरोग्यविषयक फायद्यासाठी देखील नर्मदेची भावभक्तीत परिक्रमा करण्यात येत आहे. या परिक्रमेसाठी येणाºया भाविकांसोबत धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील काही भाविकांनी देखील परिक्रमेला सुरुवात केली आहे. उतारपाडा (खुंटामोडी) येथील दत्तू तडवी, खुंटामोडीच्या अनेकांसह विरेंद्र भारती यांचा देखील समावेश आहे.४परिक्रमातील भाविकांसाठी झालेल्या सुवधेत आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ धडगाव या संस्थेच्या शाळांचा समावेश आहे. तर ंयाच संस्थेमार्फत पिंप्रापाणी ता. अक्कलकुवा येथे सुविधा करण्यात आली होती. परंतु सद्यस्थितीत तेथे सुविधा दिली जात नाही.