शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

शहादा तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांमुळे रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : शहादा तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : शहादा तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग आठ दिवस जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणी साठून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ पावसामुळे उडीद, मूग या पिकांचे आधीच नुकसान झाले होते़ आताच्या सलग पावसात कापूस, सोयाबीन, पपई आदींचे नुकसान झाले आहे़ यामुळे शेतकरी हतबल झाले असून शेतातील पाण्यामुळे पिकांवर इतर रोगांचा प्रादुर्भावही वाढीस लागला आहे़गेल्या दोन वर्षात अतीवृष्टी आणि अवकाळी यांचा फटका बसल्याने शेतकºयांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे़ खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले़ यानंतर शेतकºयांनी सोयाबीन पेरणी केली़ परंतु बियाण्याची गुणवत्ता ही खालावलेली असल्याने अनेक ठिकाणी सोयाबीन उगवलेच नाही़ यातून शेतकºयांनी दुबार पेरणी केली़ अनेकांनी दुबार पेरणी करुनही सोयाबीन उगवले नाही़ काही शेतकºयांचे सोयाबीन उगवले परंतु सलग सुरू असलेल्या पावसात हा सोयाबीन पाण्याखाली गेला असून त्यातून एक रूपयाही उत्पादन येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे़तालुक्यात यंदाही शेतकºयांनी पपईची लागवड केली आहे़ जिल्ह्यातील सर्वाधिक पपई उत्पादन घेणारा तालुका म्हणून शहादा तालुक्याची ख्याती आहे़ अत्यंत खर्चिक अशा या पिकावर हजारो रुपयांचा खर्च करुन शेतकºयांनी झाडे जगवली होती़ पाणी शेतात पाणी साचले असल्याने पिकावर मरत आला असून झाडाची पाने पिवळी पडू लागली असल्याचे दिसून आले आहे़यंदा पपईवर प्रारंभीपासून करपा मोजेक या रोगाचा प्रादुर्भाव होता़ यातून झाडांवर कमीत कमी फळे दिसून येत होती़ पावसामुळे पपई पूर्णपणे कामातून गेली आहे़कापूस हे नगदी पिक म्हणून ओळखले जाते़ तालुक्यात यंदा ५० हजार ४८२ हेक्टरवर कापसाची लागड करण्यात आली आहे़ तालुक्यात सरासरी ११८ टक्के हा कापूस लागवड झाला होता़ यामुळे शेतकºयांची मोठी भिस्त कापूस उत्पादनावर होती़ परंतू पावसामुळे तालुक्यातील मोठा हिस्सा बाधित झाला आहे़ तालुक्यात येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण होवून निश्चित आकडेवारी समोर येणार आहे़ दरम्यान सलग आठ दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतशिवारात अद्यापही पाणी साचले आहे़ परिणामी बुरशी लागून कापसाची झाडे मरू लागली आहेत़ बोंडे अती पावसामुळे सडून गेली असून ही वाताहत पाहून शेतकरी हताश झाले आहेत़ पाणी काढणे शक्य होणार नसल्याने शेतकºयांनी पिक तसेच सोडून देण्याचा निर्णय छातीवर दगड ठेवून घेतला असल्याचेही यावेळी सांगण्यात आले़दरम्यान कृषी विभागासोबत संपर्क केला असता काहीच ठिकाणी पंचनामे झाल्याचा खुलासा कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी वि़भा़जोशी यांच्याकडून करण्यात आला आहे़ बºयाच ठिकाणी पथक गेलेले नाही़

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, कळंबू, टेंभा, कुरावद, कौठळ ,बिलाडी या गावांची भौगोलिक परिस्थिती पाहता या गावांच्या उत्तरेस डोंगराळ भाग आहे़ यामुळे उंचीवरून कोसळणारे पावसाचे पाणी सरळ दक्षिणेकडे येऊन पाणी साचते़ तालुक्यातील वडाळी, बामखेडा, कोंढावळ, जयनगर, धांद्रे यासह विविध गावात खोलगट भाग असल्याने पावसाचे पाणी शेतात साचते़ हीच गत तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या गावांमध्ये आहे़ परंतु याठिकाणी सातपुड्याच्या डोंगराळ भागातून उतारावरून येणाऱ्या नद्या व नाले शेतांमध्ये पाणी आणून पिकांचे नुकसान करत आहेत़४एकीकडे खरीप पिकांचे नुकसान झाले असताना शहादा तालुक्यातील रायखेड, ब्राह्मणपुरी परिसरातील गावात वादळी वारे आणि पाऊस यामुळे केळीच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी होत आहे़ झाडावर आलेल्या केळीच्या घोड्यांसह झाडे कोसळली असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे़ या पिकांचे अद्याप पंचनामे झालेले नसल्याची माहिती आहे़