लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ६६ जणांचे अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत़ यात तिघांचा मृत्यू झाला असून एकाच दिवसात तीन मृत्यू आणि ६६ पॉझिटिव्ह यामुळे जिल्हा हादरला आहे़मंगळवारी नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागातील ७१ वर्षीय पुरूष, नंदुरबार तालुक्यातील दहिंदुले ६० तर शनिमांडळ येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता़ सायंकाळी अधिकृतपणे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते़ दरम्यान तिघांच्या मृत्यूची माहिती समोर येत असतानाच दुसरीकडे शहादा व नंदुरबार येथील ६५ तर तळोदा येथील एक अशा ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ एकाचवेळी ६६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या ७१८ एवढी झाली आहे़ आजअखेरीस ४०७ तर मयतांची संख्या ३९ झाली आहे़पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील आठ, परीमल कॉलनी, सोनार गल्ली, ब्राह्मणपुरी, कोविड केअर सेंटर मोहिदे, सालदार नगर, सिद्धार्थ नगर येथे प्रत्येकी एक, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे येथे दोन, शनिमांडळ येथे पाच, विखरण येथे एक, खोंडामळी येथे सात, विलगीकरण कक्ष चार, देसाईपुरा-कुंभारवाडा येथे १४, बाहेरपूरा एक, रघुकूल नगर ३, करजकुपा तीन, भाग्योदय नगर ४, साक्री नाका, नळवा रोड, नवापूर रोड, रनाळे, एलीजा नगर आणि कमलकुंज नगर नळवा रोड येथील प्रत्येकी एक तर तळोदा येथील एक अशा ६६ जणांचा समावेश आहे़ एकाच दिवसात बाधितांची संख्या वाढल्याने कोविड कक्षात उपचार घेणाऱ्यांची संख्या २४८ झाली आहे़ नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, खोंडामळी, रनाळे व शहादा तालुक्यातील सारंगखेडा या मोठ्या गावांसोबतच छोट्या गावांमध्येही रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत़ सर्व बाधितांना जिल्हा रुग्णालय, एकलव्य कोविड केअर आणि मोहिदे ता़ शहादा येथील ेकोविड केअरमध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ रात्री उशिरापर्यंत या रुग्णांना नंदुरबारात आणले जात होते़