शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

नंदुरबारात सर्वच भागात प्रादुर्भाव 11 दिवसात 378 नवे रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 21:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यात नंदुरबार आघाडीवर आहे. शहर व तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यात नंदुरबार आघाडीवर आहे. शहर व तालुक्यात मार्च महिन्यात अर्थात १० दिवसात ३७८ कोरोना बाधीत आढळून आले आहेत. त्या खालोखाल शहादा शहर व तालुक्यात १५३ रुग्ण  आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्याचा पॅाझिटिव्हीटी रेट हा १५.७५ इतका आहे. तर दोन दिवसात हाच रेट १७ टक्केपर्यंत गेला आहे. नंदुरबार जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या १५ दिवसांपासून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे  जिल्हावासीयांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाची संपर्क साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने उपाययोजनांना गती दिली आहे. त्याअंतर्गत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नंदुरबार ठरू पहातोय हॅाटस्पॅाटनंदुरबार शहर व परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. १ ते ११ मार्च या दरम्यान ३७८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे वयोगट हा १७ ते ७० असल्याने चिंता वाढली आहे. सद्या शाळा सुरू असल्याने पालक धास्तावले आहेत. शहरातील शासकीय मुलींच्या निवासी शाळेतील ३० मुली कोरोना बाधीत आढळून आल्या होत्या. त्यानंतर शहरातील एका नामांकित शाळेतील दोन विद्यार्थीनी आढळल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही कोरोनाच फैलावत असल्याचे चित्र आहे. याच दरम्यान जिल्ह्यातील प्राथमिक शाळा देखील सुरू करण्यात आल्या आहेत. अर्थात प्राथमिक शाळा केवळ ग्रामिण भागातील सुरू आहेत. शहरी भागातील नसल्या तरी ग्रामिण भागात शाळेत जाणारे शिक्षक हे शहरी भागातूनच जात असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात कोरोना रुग्ण गेल्या तीन महिन्यांपासून आढळून येत नव्हते. मात्र, दोन दिवसांपासून धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात देखील रुग्ण वाढले असल्याचे चित्र आहे. शहादाही मागे नाहीजिल्ह्यात नंदुरबार व शहादा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास सारखीच आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील जवळपास सारखीच येत आहे. मार्च महिन्यात अर्थात १ ते ११ मार्च दरम्यान तालुक्यात १५३ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात कलमाडीतर्फे बोरद तसेच करणखेडा या गावांना मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले होते.लग्न समारंभ ठरले कारणगेल्या महिनाभरात झालेल्या लग्न समारंभांमधील गर्दी कोरोना वाढीस लागण्यास कारणीभूत ठरली आहे. लोकं लग्न व सार्वजनिक समारंभांमध्ये कुठलेही बंधने पाळत नाहीत. मास्कचा वापर नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही, सॅनिटायझरचा उपयोग होत नव्हता. त्यामुळे त्या काळात वाढलेले रुग्ण व त्यांची वाढलेली संपर्क साखळी आता जीवघेणी ठरू लागली आहे. दुर्गम भागातही...कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या तीन ते चार महिन्यात दुर्गम भागात नव्हता. अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून येत नव्हता. मात्र गेल्या चार दिवसांपासून या दोन्ही तालुक्यात रुग्ण आढळून येत आहेत. स्थलांतरीत मजूर आता परतू लागले आहेत. त्यामुळे धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरी भागातून दुर्गम भागात जाणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचारींमुळेही धोका वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

   नंदुरबारात सर्वच भागात नंदुरबारात गेल्या ११ दिवसात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे १० रोजी ७० इतके आढळून आले होते. १ रोजी १२, २ रोजी ४१, ३ रोजी ३५, ४ रोजी २६, ५ रोजी ३०, ६ रोजी १८, ७ रोजी ११, ८ रोजी ४४, ९ रोजी ५८ तर ११ रोजी सायंकाळपर्यंत ७८ रुग्ण आढळून आले होते. शहरातील सर्वच भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने शहरवासी धास्तावले असून चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

   शहादा पुन्हा वाढतेय...शहादा शहरासह ग्रामिण भागात देखील कोरोनाचा फैलाव कायम आहे. ११ दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक २८ रुग्ण ९ मार्च रोजी होते. १ रोजी १२, २ रोजी १३, ३रोजी १६, ४ रोजी सहा, ५ रोजी नऊ, ६ रोजी एकही नाही, ७ रोजी १२, ८ रोजी एक, १० रोजी नऊ तर ११ रोजी सायंकाळपर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. कलमाडीतर्फे बोरद आणि करणखेडा ही हॅाटस्पॅाट ठरली. 

११ दिवसात आठ मृत्यू : ११ दिवसात आठ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ११दिवसात डेथ रेट हा १.४ टक्के आहे तर जिल्ह्याचा आतापर्यंतचा डेथ रेट हा २.२८ इतका राहिला आहे. १० रोजी एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृत्यूचा वयोगट हा ४५ ते ७० असा आहे. त्यामुळे वयोवृद्ध आणि विविध व्याधीग्रस्तांनी काळजी घेणे गरजेचे आहे.