रखडलेले १२४ हातपंप बसवण्याचे मिळाले आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:43 PM2020-06-05T12:43:33+5:302020-06-05T12:43:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखड्यात मंजूर केलेल्या हातपंपांना अखेर मूहूर्त मिळाला आहे़ दुर्गम भागासह ...

Orders were received to install 124 hand pumps | रखडलेले १२४ हातपंप बसवण्याचे मिळाले आदेश

रखडलेले १२४ हातपंप बसवण्याचे मिळाले आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखड्यात मंजूर केलेल्या हातपंपांना अखेर मूहूर्त मिळाला आहे़ दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमध्ये मंजूर असलेल्या १२४ हातपंपांचे काम थेट पावसाळ्यात पूर्ण करण्याचे आदेश काढण्यात आले असून दोन महिन्याच्या अवधीत गावोगावी हातपंप सुरु होणार आहेत़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयांमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने विविध कामे रखडली होती़ यात टंचाई निवारण आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या हातपंपांचाही समावेश करण्यात आला होता़ गेल्या १५ दिवसात या कामांना वेग आला असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १२४ हातपंप आणि विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजूर करुन त्यांना कार्यरंभ आदेश दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर हातपंप आणि पाणी योजनांची मागणी करणाऱ्या गावांना पावसाळ्यात शुद्ध आणि पिण्यायोग्य पाणी मिळणार असून दोन महिन्याच्या आत हा उपक्रम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ दरम्यान अक्कलकुवा तालुक्यात डेब्रामाळ येथील पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न गेल्या वर्ष भरापासून प्रलंबित होता़ साहित्य बसवूनही प्रशासन याठिकाणी पाण्याच्या मोटारी बसवत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते़ याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबधित विभागाने कामकाजाला गती दिली असून येत्या आठवड्यात या ठिकाणी मोटारी बसवून पाणी योजनेची ‘टेस्टींग’ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़
कोरोनामुळे तालुकनिहाय रखडलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे बांधकामे तसेच दुरुस्तीच्या कामांचे प्रस्तावही सध्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे़

यंदाच्या टंचाई निवारण आराखड्यात आदिवासी उपयोजनांतर्गत ६५ तर इतर योजनेतून ५९ असे एकूण १२४ हातपंप मंजूर करण्यात आले होते़ यासाठी १ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली होती़
४धडगाव तालुक्यात ३१, अक्कलकुवा २७, नंदुरबार २९, नवापूर ३०, शहादा ११ आणि तळोदा तालुक्यात १० हातपंप मंजूर करण्यात आले होते़ गतकाळात लॉकडाऊनमुळे आलेल्या अडचणीत हे हातपंप रखडले होते़ या हातपंपांना नुकताच कार्यरंभ आदेश जारी करण्यात आला असून नियुक्त ठेकेदाराकडून हे काम दोन महिन्याच्या अवधीत पूर्ण होईल़

अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील पाणी योजनेचा प्रश्न गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे़ यासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्चाची सोलर पाणी पुरवठा योजना मंजूर करुन साहित्य बसवण्यात आले होते़ परंतू योजनेची चाचणी रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता़ यावर मार्ग काढून प्रशासनाने आठ दिवसात चाचणी करुन योजना सुरु करण्याचे नियोजन केले आहे़
४टंचाई आराखड्यत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मागणी करणाºया ग्रामपंचायतींना पाणी योजना देण्याचे सूचित केले गेले होते़ यानुसार जिल्ह्यातून २१ प्रस्ताव मंजूर झाले असून या प्रस्तावांवर कारवाई करुन नळपाणी योजना १९ गावांमध्ये तातडीने सुरु केली जाणार आहे़

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कामकाजाला गती दिली आहे़ दोन महिन्यात हातपंप पूर्ण होतील़ पावसाळ्यात कामांना वेग देण्यात यावा यासाठी वेळोवेळी संबधितांकडून आढावा घेत पाणीटंचाई दूर करण्यात येणार आहे़
-पी़टी़बडगुजर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि़प़नंदुरबाऱ

Web Title: Orders were received to install 124 hand pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.