लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महागडे ज्ॉकेट ऑनलाईन ऑर्डर करणे मोठी राजमोही ता़ अक्कलकुवा येथील युवकास चांगलेच महागात पडले असून त्याची 75 हजार रुपयात फसवणूक झाली आह़े 29 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान फसवणूकीचा हा प्रकार घडला आह़े स्नेहराज तारसिंग वसावे असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आह़े 29 सप्टेंबर रोजी महाविद्यालयीन शिक्षण घेणा:या स्नेहराज याने मोबाईलवर एक ज्ॉकेट पसंत करत ऑनलाईन बुकींग करत ऑर्डर दिली होती़ यानंतर त्याने ज्ॉकेटसाठी तब्बल 75 हजार 40 रुपये संबधित अॅपद्वारे ज्ॉकेट विक्रेत्यांना दिले होत़े परंतू ते वेळेवर न मिळाल्याने ऑर्डर रद्द करुन पैसे परत मागितले होत़े दरम्यान गेल्या महिन्यात त्याला अज्ञात आरोपींनी संपर्क करुन मोबाईलवरुन माहिती घेत त्याचे वडील तारसिंग दिवाल्या वसावे यांच्या पेटीएम खात्याला लिंक असलेला ओटीपी मागून घेत 75 हजार 40 रुपये परस्पर काढून घेतले होत़े ही रक्कम संबधितांनी बँक ऑफ बडोदाच्या गुजरात राज्यातील जंबुसार येथील खात्यातून काढल्याची माहिती आह़े याप्रकारामुळे घाबरलेल्या युवकाने कुटूंबियांना माहिती देत पोलीस ठाणे गाठल़े याप्रकरणी स्नेहराज याने दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात भामटय़ाविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे करत आहेत़
ज्ॉकेट ऑर्डर करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:53 IST