शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

युजीसीच्या अन्यायकारक तरतुदींना विरोध : प्राध्यापक संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:10 IST

जिल्हास्तरीय मेळाव्यात विविध चर्चा

नंदुरबार : युजीसी रेग्यूलेशन 2018 मधील अन्यायकारक तरतुदींना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटना अर्थात एन.मुक्टोचा विरोध राहणार असल्याचे संघटनेच्या जिल्हा मेळाव्यात स्पष्ट करण्यात आले.संघटनेचा मेळावा जीटीपी महाविद्यालयात रविवारी दुपारी झाला. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय सोनवणे होते. विद्यापीठ निवडणुकांनंतर पहिलाच विजयी मेळावा घेण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस प्रा.सावखेडकर, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ.मनोहर पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल पाटील, सहसचिव पी.बी. अहिरराव,  डॉ.मोहन पावरा, विद्या परिषद सदस्य डॉ.टी.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी, जिल्हाध्यक्ष डॉ.सी.पी.सावंत, डॉ.सुनील कुवर उपस्थित होते. सरचिटणीस प्रा.सावखेडकर यांनी पुढील आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट होईल, असे सांगितले. तसेच ए.आयफक्टोतर्फे युजीसी रेग्युलेशन 2018 मधील अन्याय तरतुदींना विरोध असल्याची माहिती दिली. डॉ.संजय सोनवणे यांनी उमविच्या घाईगर्दीच्या निर्णय प्रक्रियेवर तसेच सरकारच्या शिक्षक विरोधी धोरणांवर टीका केली. यामुळे प्राध्यापकांचे विद्याथ्र्याचे बरेचसे प्रश्न प्रलंबित असल्याने महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या माध्यमातून 71 दिवसाच्या वेतनाचा प्रश्न रिक्त पद भरतीचा प्रश्न सातव्या वेतन आयोग अंमलबजावणी, नवीन पेन्शन योजना रद्द करणे, कंत्राटी शिक्षकांचे प्रश्न आदींसह 11 मागण्यांसाठी सप्टेंबर महिना हा आंदोलनास असेल असे जाहीर केले. त्यानुसार ऑगस्ट रोजी काळ्याफिती आंदोलन, 20 ते 31 ऑगस्ट सहसंचालक / जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 सप्टेंबर रोजी काळदिवस व अटक करून घेणे, 11 सप्टेंबर एक दिवसीय काम बंद आंदोलन, 25 सप्टेंबर पासून बेमुदत कामबंद आंदोलन असे टप्पे त्यांनी विशद केले. प्रास्ताविक डॉ.सी.पी.सावंत यांनी केले. सूत्रसंचलन डॉ.सुनील कुवर तर आभार  डॉ.बी.बी.मंगळे यांनी मानले.