शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

तळोदा येथील जिल्हा बैठकीत पीओस प्रणालीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 11:50 IST

चलन न भरण्याचा एकमताने निर्णय

तळोदा : पीओएस प्रणालीतील सावळागोंधळ थांबवावा. रेशन धान्यात कपात करण्याच्या शासनाच्या अन्यायकारक धोरणास तीव्र विरोध करून या महिन्याच्या धान्यासाठी चलन न भरण्याचा निर्णय जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी मंगळवारी तळोदा येथील बैठकीत घेतला. याबाबत बुधवारी जिल्हा प्रशासनाची भेटदेखील घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या या पावित्र्यामुळे ऐन सणासुदीच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनापुढे रेशन वाटपाचा प्रश्न निर्माण होणार            आहे. साहजिकच हा तिढा प्रशासन कसे हाताळते याकडे लक्ष लागून आहे.शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागाने या महिन्यापासून पीओएस यंत्रावरच रेशनचे धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना तशा आशयाच्या सूचना एका लेखी पत्रानुसार देण्यात आल्या असून आपोआपच धान्यातही कपात होणार आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानदारांची बैठक मंगळवारी येथील कनकेश्वर मंदिरात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन होते. व्यासपीठावर आमशा पाडवी, शानूबाई वळवी, देवीदास अल्हाटकर, जयसिंग माळी, सुरेश इंद्रजित, अरविंद कुवर, वांगीबाई पावरा, राजेंद्र गुरव आदी उपस्थित होते. या वेळी शासनाच्या गरीबांच्या रेशन धान्याबाबत अन्यायकारक धोरणामुळे त्यांना वंचित ठेवण्याचा डाव असून पीओएससारखी क्लिष्ट प्रणाली लागू केली आहे. आता तर थम्बशिवाय कार्डधारकांना स्वस्त धान्य न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे थम्ब मॅच न होणा:यांना धान्य मिळणार नाही. साहजिकच त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागणार आहे. वास्तविक पीओएस प्रणाली लागू करताना त्यातील साधनसामग्री सुसज्ज करूनच लागू केली पाहिजे होती. मात्र त्यात सतत सावळागोंधळच सुरू आहे. एकीकडे शासन अन्न सुरक्षा कायद्यानुसार कुणालाही धान्यापासून वंचित न ठेवण्याची सक्त ताकीद दुकानदारांना देते तर दुसरीकडे शासनच अशी अन्यायकारक धोरण लागू करून गरीबांना धान्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. जोपावेतो जिल्हा पुरवठा विभाग धान्याची कपात न करता 100 टक्के धान्य उपलब्ध करून देणार नाही तोपावेतो कोणत्याही दुकानदाराने प्रशासनाकडे चलन न भरता धान्याची उचल करू नये, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष नेमीचंद जैन, अरविंद कुवर, शानूबाई वळवी, सुरेश इंद्रजित, जयसिंग माळी            यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक श्रावणगीर गोसावी यांनी तर सूत्रसंचालन ताराचंद साळवे यांनी केले. बैठकीला साक:या पाडवी, विजय कदम, वसंत पाडवी, यशवंत चौधरी, रमण चौधरी, पोपट माळी, दिलीप टवाळे, भालचंद्र राणे, शरफू तेली, सिंधूबाई पिंपळे, सुनील सूर्यवंशी, विनोद चौधरी यांच्यासह तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शहादा व नंदुरबार तालुक्यातील रेशन दुकानदार महिला व पुरुष उपस्थित होते.