शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
3
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
4
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
5
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
6
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
7
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
8
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
9
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
10
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
11
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
12
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
13
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
14
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
15
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
16
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
17
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
18
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
19
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
20
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?

मुंबई भरारी पथकाच्या कारवाईत नवापुरात दोन कोटीची अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 17:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने सुकवेल, ता.नवापूर येथील शेतात केलेल्या कारवाईत तब्बल दोन कोटी रुपयांचे हरियाणा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील राज्य भरारी पथकाला सुकवेल, ता.नवापूर शिवारातील शेतात अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील भरारी पथकाने सुकवेल, ता.नवापूर येथील शेतात केलेल्या कारवाईत तब्बल दोन कोटी रुपयांचे हरियाणा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथील राज्य भरारी पथकाला सुकवेल, ता.नवापूर शिवारातील शेतात अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथक मंगळवारी रात्री नवापूरात दाखल झाले. सोबत नाशिक विभागाचे भरारी पथक आणि नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी, कर्मचा:यांना सोबत घेवून कारवाई केली. सुकवेल येथील शेतातील घरात हरियाणा बनावाटीचा मोठा अवैध दारूचा साठा आढळून आला. त्यात रॉक अॅण्ड स्ट्रॉम व्हिस्कीच्या 12 हजार 576 बाटल्या, गोवा प्रिमियम व्हिस्कीच्या  26 हजार 116 बाटल्या, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 61 हजार 200 बाटल्या, ऑल सिझन व्हिस्कीच्या तीन हजार 624 बाटल्या, एपिसोड व्हिस्कीच्या 768 बाटल्या, रॉयल ग्रीन व्हिस्कीच्या 288 बाटल्या, रॉयल ग्रीन व्हिस्कीच्या 192 बाटल्या आदी वेगवेगळ्या विदेशी दारूचे 2,475 बॉक्स जप्त करण्यात आले. त्यांची किंमत दोन कोटी दोन लाख 50 हजार 720 रुपये इतकी आहे. हा सर्व साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत संशयीत एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, दक्षता व अंमलबजावणी पथकाचे संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रसाद सुव्रे, निरिक्षक प्रसाद सास्तूरकर, दिपक परब, दिलीप काळेल, प्रमोद कांबळे नंदुरबार अधीक्षक मोहन वर्दे व पथकाने केली. त्यांना नाशिक विभाग, पुणे विभाग भरारी पथक व नंदुरबारच्या पथकाने मदत केली. नवापूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचा:यांनी बंदोबस्त ठेवला.