शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

जून महिन्यात केवळ सात दिवस पावसाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मान्सूनच्या सरी बरसण्याची प्रतिक्षा असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्यांची पुन्हा निराशा झाली आह़े जून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मान्सूनच्या सरी बरसण्याची प्रतिक्षा असलेल्या जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्यांची पुन्हा निराशा झाली आह़े जून महिन्यात दमदार पाऊस बरसणार अशी अपेक्षा असताना सरासरी सात दिवस केवळ 43़4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आह़े यामुळे 30 टक्के क्षेत्रात पेरण्या झाली असून मध्यम आणि लघुप्रकल्पही भरु शकलेले नाहीत़    जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर यादरम्यान पावसाळा गणला जाता़ सरासरी 145 दिवस पावसाची नोंद व्हावी अशी अपेक्षा असत़े परंतू गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात जास्तीत जास्त 60 दिवस पाऊस कोसळत आह़े यात  खंडाचे प्रमाण हे आठवडय़ापेक्षा अधिक असल्याने भूजलाचा प्रश्न गंभीर बनला आह़े जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी 123़8 पावसाची अपेक्षा असत़े परंतू जूनमध्ये पावसाची स्थिती गंभीर असून 2012 पासून जून महिन्यात पावसाची स्थिती दयनीय असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े गत पाच वर्षातील जून महिन्यात धडगाव आणि अक्कलकुवा या दोनच तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला़ ंजून महिन्यात नंदुरबार तालुक्यात सरासरी 109, नवापुर 143, शहादा 113, तळोदा 106, धडगाव 120 आणि अक्कलकुवा तालुक्यात 149 मिलीमीटर पाऊस पडतो़  नुकत्याच संपलेल्या जून महिन्यात नंदुरबार तालुक्यात 60़4 मिलीमीटर पावसाने 5 दिवस, नवापुर 45 मिलीमीटर पाऊस 2 दिवस, शहादा 37़2 मिलीमीटर 2 दिवस, तळोदा 28 मिलीमीटर 3, धडगाव 111 मिलीमीटर  12 तर अक्कलकुवा तालुक्यात 43़4 मिलीमीटर पावसाने 7 दिवस हजेरी लावली आह़े सर्वाधिक पाऊस हा धडगाव त्र सर्वाधिक कमी पाऊस हा तळोदा तालुक्यात झाला आह़े गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सर्वाधिक कमी पाऊस कोसळला आह़े गेल्या वर्षाच्या जून महिन्यात नंदुरबार 109, नवापुर 77, शहादा 90, तळोदा 83, धडगाव 119 तर अक्कलकुवा तालुक्यात 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती़ गेल्यावर्षीही सर्वाधिक 11 दिवस धडगाव तर सर्वाधिक कमी 5 दिवस नवापुर तालुक्यात पाऊस झाला होता़ 

जिल्ह्यात यंदा सरासरी 2 लाख 45 हजार 449 हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड होणार आह़े सात जूनऐवजी पावसाने यंदा थेट 24 जून रोजी हजेरी लावल्याने पेरण्याच होऊ शकल्या नव्हत्या़ जूनच्या अंतिम आठवडय़ात काहीशी गती आल्याचे दिसून आले आह़े आजअखेरीस नंदुरबार तालुक्यात 26 हजार 132, नवापुर 4 हजार 925, शहादा 11 हजार 787, तळोदा 5 हजार 306, धडगाव 12 हजार 441 तर अक्कलकुवा तालुक्यात आतार्पयत 13 हजार 190 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आह़े एकूण 73 हजार 812 हेक्टरवर या पेरण्या पूर्ण झाल्याने 30 क्षेत्र खरीप पिकांच्या लागवडीखाली आह़े यंदा कापसाच्या 1 लाख 6 हजार 9 हेक्टर निर्धारित क्षेत्रापैकी आतार्पयत 34 हजार 375 हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड होऊ शकली आह़े सर्वाधिक 20 हजार हेक्टर कापूस नंदुरबार तालुक्यात लागवड झाला आह़े 

जिल्ह्यात रंगावली, सारंगखेडा, प्रकाशा, दरा आणि शिवण या पाच मध्यम प्रकल्पांची क्षमता 200़91 दशलक्ष घनमीटर पाण्याची आह़े येथे आजघडीस 42़835 दशलक्ष घनमीटर जलसाठा आह़े तर 37 लघुप्रकल्पांमध्ये 88़5 पैकी केवळ 8़83 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आह़े