शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

२८ गावांना एकच पशुचिकित्सक

By admin | Updated: June 1, 2014 00:41 IST

तळोदा तालुक्यातील बोरद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशु वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहे़

 गुलाबसिंग गिरासे ल्ल बोरद तळोदा तालुक्यातील बोरद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशु वैद्यकीय अधिकार्‍यांचे पद गेल्या दीड वर्षांपासून रिक्त आहे़ या रिक्त पदावर मोड पशु वैद्यकीय दवाखान्याचे पशु वैद्यकीय अधिकारी काम प्रभारी म्हणून काम पाहात आहेत़ प्रभारी पदभार सांभाळणार्‍या अधिकार्‍यावर मोड परिसरातील एकूण २८ गावांची जबाबदारी आहे़ परिणामी लसीकरण मोहिमेला अडचणी येत आहेत़ बोरदच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अखत्यारित मालदा, तुळाजा, बन, न्यु बन, धजापाणी, छोटा धनपूर, करडे, जुवानी, लाखापूर (फॉ) व (रेव्ह) बोरद, कलमाडी आदींसह इतर गावांचा समावेश आहे़तर मोड दवाखान्याला मोड, कढेल, आष्टे, मोहिदा,कळमसरे, खरवड,तºहावद, खेडले आदीसह गावांचा समावेश आहे़ या गावांमध्ये बोरद दवाखान्याला जोडलेली सुमारे ८० टक्के गावेही सातपुड्यातील आहेत़ येथील पशुपालक पायी प्रवास करून दवाखान्यात येतात़ परंतु अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याने त्यांना ताटकळत बसावे लागते़ या गावांमध्ये प्रामुख्याने शेळ्या, मेंढ्या, गायी व गावराणी कोंबड्याचे मोठ्या प्रमाणावर पालन केले जाते़ बोरदला अधिकारी नियुक्त झाल्यास दुर्गम भागातील पशुपालकांच्या समस्या सुटणार आहेत़ तळोदा तालुक्यातील बोरद येथील पशु वैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चे पशु वैद्यकीय अधिकारी यांची दीड वर्षांपूर्वी बदली झाल्याने त्यांचा पदभार मोड दवाखान्याच्या अधिकार्‍याकडे देण्यात आला आहे़ दीड वर्ष उलटूनही जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून या पदावर नवीन अधिकार्‍याची नियुक्ती होत नसल्याने एकाच अधिकार्‍यावर मोड दवाखान्याची दहा व बोरद दवाखान्याच्या १८ गावांची जबाबदारी आली आहे़ पशुसंवर्धन विभागाची कामधेनू दत्तक योजना दोन्ही पशुवैद्यकीय दवाखान्यात योग्यप्रकारे राबत नसल्याचे चित्र आहे़ ही योजना पशुपालकांच्या फायद्याची आहे़ यामुळे गुरांचे पावसाळ्यापूर्वीचे लसीकरण रखडत होत असल्याचे चित्र आहे़ गुरांना पावसाळ्यात होणार्‍या घटसर्प, फर्‍या, लाळी खुरगतसह विविध आजारांवर लस देण्यासाठी सध्या पशुपालकांची लगबग सुरू आहे़ पशुसंवर्धन विभागाने बोरद पशुवैद्यकीय दवाखान्यात रिक्त असलेल्या पदावर अधिकार्‍याची नेमणूक करण्याची मागणी वारंवार करूनही कारवाई होत नसल्याने नाराजी आहे़