शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

फक्त शेगडी मिळाली; अजून हंडीची वाट पाहतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:04 IST

शेगडी मिळाली, अजून हंडीची वाट पाहतोय, अर्धा दिवस वीज नसते,

- मिलिंद कुलकर्णी काठी (जि.नंदुरबार) : शेगडी मिळाली, अजून हंडीची वाट पाहतोय, अर्धा दिवस वीज नसते, त्यामुळे टी.व्ही. तर सोडा जगाशी संपर्क साधणाऱ्या मोबाइलच्या चार्जिंगसाठी मोठ्या गावात जाऊन दहा रुपये मोजावे लागतात, हे चित्र सातपुडा डोंगरातील आदिवासी पाड्यांमधील आहे. लोकसभा निवडणुका, केंद्र सरकारच्या घोषणा, विरोधी पक्षांचे आरोप, स्थानिक उमेदवार याविषयी काहीही देणेघेणे नसल्याची स्थिती जिल्ह्यातील दुर्गम भागात आहे.नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार जयवंतराव नटावदकर यांचे पूत्र डॉ. सुहास नटावदकर यांनी केलेली बंडखोरी, ९ वेळा निवडून येण्याचा विक्रम केलेल्या माणिकराव गावीत यांच्याऐवजी काँग्रेसने आमदार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांना दिलेली उमेदवारी, भाजपच्या डॉ. हीना गावीत या दुसऱ्यांदा अजमावत असलेले नशिब याविषयी माध्यमांमध्ये चर्चा असली तरी सातपुड्याच्या दुर्गम भागात निवडणुकीचे काहीही वातावरण नाही. वडफळ्या, मोलगी, विसरवाडी, खांडबारा अशा मोठ्या गावांमध्ये निवडणुकीवर थोडी फार चर्चा दिसून येते, पण पिंपळखुटा, काठी, खर्डा, मुंदलवड, हरणखुरी याठिकाणी निवडणुकीचा विषयही चर्चेत आला नाही. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे उन्हाळ्यातील प्राधान्यक्रम वेगळे आहेत. भोंगºया बाजार, होळी व मेलदा उत्सव गेल्या महिन्यात आटोपले. या उत्सवाच्या निमित्ताने मध्य प्रदेश, गुजरातमध्ये मजुरीसाठी स्थलांतर केलेले महिला-पुरुष परतले आहेत. परतल्यावर त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी प्रकल्प राबविलेल्या मोजक्या गावांमध्ये पाण्यासह काही सुविधा झाल्या आहेत, पण शासकीय सुविधा नावालाच आहेत. कुठेतरी हायमास्ट लॅम्पचा पोल दिसतो, तर एखाद्या गावात हातपंप दिसतो. उज्ज्वला योजनेची शेगडी मिळाली, पण गॅस हंडी अद्याप मिळाली नसल्याची काही गावांमध्ये स्थिती आहे.>मोबाईल चार्जिंगसाठी पैसे लागतात!काठी गावातील संस्थानिकांची होळी प्रसिध्द आहे. देशविदेशातील नागरिक ती बघायला आवर्जून येतात. होळीचे मैदान पेव्हर ब्लॉक बसवून चकचकीत केले आहे. पण अर्ध्या दिवसापेक्षा अधिक काळ वीजपुरवठा नसतो. मोबाईल चार्जिंगसाठी मोलगी या मोठ्या गावात जाऊन दुकानदाराला १० रुपये द्यावे लागतात. इन्व्हर्टरच्या मदतीने एकावेळी ५-६ मोबाईल चार्र्जींग केले जातात. हा नवीन व्यवसाय याठिकाणी सुरु झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या शहरी भागात टपºया,दुकानांवर मिळतात, तसे येथील गावांमध्ये त्याच बाटल्यांमध्ये पेट्रोल विकायला ठेवलेले असते.