नंदुरबार : पहिली सोडत होऊन साधारणत: पंधरा दिवस उलटून गेल्यावरही जिल्ह्यात आतापर्यंत २५ टक्के मोफत प्रवेशअंतर्गत केवळ ६२ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झालेली आहे़ त्यामुळे आरटीई प्रवेशाबाबत पालकांमध्ये कमालीचा निरुत्साह असल्याचे दिसून येत आहे़८ एप्रिल रोजी पुणे येथे आरटीईअंतर्गत पहिली सोडत प्रक्रिया पार पडली होती़ पहिल्या सोडतीमध्ये जिल्ह्यातील १४० विद्यार्थ्यांची निवड करुन तशी यादी जाहिर करण्यात आली होती़ त्यानंतर पंधरा दिवस उलटूनदेखील अद्याप केवळ ६२ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती झालेली असल्याचे वृत्त आहे़जिल्ह्यात ४७ शाळांमार्फत आरटीईच्या ४७० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ यासाठी एकूण ५७३ आॅनलाईन अर्ज दाखल करण्यात आले आहेत़ पहिल्या सोडतीमध्ये १४० विद्यार्थ्यांची यादी जाहिर करुनही पालकांकडून प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरविण्यात येत असल्याने यंदाही आरटीईअंतर्गत जागा रिक्तच राहणार की काय? अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे़
२५ टक्केअंतर्गत आतापर्यंत केवळ ६२ विद्यार्थ्यांचीच प्रवेश निश्चिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 20:42 IST