नंदुरबार : नाफेडमार्फत जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार येथील खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या हरभºयाची यंदाही खरेदी करण्यात येणार आहे़ यासाठी सुरु केलेल्या नोंदणी प्रक्रियेस जिल्ह्यातील शेतकºयांनी पाठ दाखवली असून आतापर्यंत केवळ दोन्ही केंद्रांवर केवळ ८७ शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ मंगळवारी या नोंदणीची अखेरची मुदत होती़गेल्या वर्षापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या माध्यमातून हरभरा, तूर आणि सोयाबीनची खरेदी करणारे नाफेडची यंदापासून शेतकी संघाच्या माध्यमातून हरभरा, तूर आणि सोयाबीन खरेदी करणार आहे़ रब्बीत पिकवलेल्या हरभºयाना शासनाने यंदा ४ हजार ६२० रुपये प्रतिक्विंटल दर जाहिर केला आहे़ या पार्श्वभूमीवर शेतकºयांकडून नाफेडकडे हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी करणे अपेक्षित होते़ परंतू गेल्या दोन वर्षात हरभºयाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना हरभरा विक्री करुन पैसे करुन घेतले आहेत़ यामुळे नाफेडच्या केंद्रावर सध्यातरी अवकळा पसरली आहे़ मंगळवारी नोंदणी बंद झाल्यानंतर त्यास मुदतवाढीची अपेक्षा आहे़ यातून शेतकºयांची संख्या वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत असली तरी जिल्ह्यात पेरणी झालेल्या निम्म्यापेक्षा अधिक हरभरा विक्री झाला आहे़शासनाकडून राज्यभर नाफेडची केंद्रे सुरु करण्यात आली आहेत़ गेल्यावर्षापर्यंत बाजार समित्याच्या अखत्यारितील ही केंद्रे शेतकी संघातून चालवली जाणार आहेत़ बाजार समित्यांना मालाच्या खरेदीची फी द्यावी लागत असल्याने शासनाचा खर्च वाढला होता़ हा खर्च कमी करण्यासाठी मार्केट कमिट्यांच्या हक्काच्या रकमेवर कपातीचे धोरण स्विकारुन ही केंद्रे शेतकी संघातून चालवली जाणार आहेत़ यातून नंदुरबार आणि शहादा येथील सर्वात मोठ्या बाजार समित्यांना आर्थिक फटका बसणार आहे़
नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये केवळ ८७ शेतकऱ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 11:42 IST