लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वाहतूक व्यवस्थेतील बेशिस्तीमुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना पोलीस दलाने चालू वर्षात दिलासा दिला आह़े नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील वाहतूक शाखेसाठी गत महिन्यापासून ई-चलन मशिनचा वापर सुरु झाल्याने बेशिस्त वाहनधारकांवर ब:यापैकी अंकुश ठेवण्यात पोलीसांना यश आले आह़े राज्यभर पोलीस दल हायटेक करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आह़े या प्रयत्नात नंदुरबार जिल्हाही मागे नसून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईसाठी 24 मे पासून जिल्ह्यात सर्व वाहतूक शाखांसाठी ई-चलन मशिन वाटप करण्यात आले होत़े या मशिनचा सर्वाधिक वापर सध्या नंदुरबार शहरात होत असून वाहतूक शाखेच्या कर्मचा:यांनी केवळ 24 दिवसात तंत्रज्ञानाचा योग्य वापर करत तब्बल 351 कारवाया केल्या आहेत़ पळून जाणारे वाहनधारक किंवा पैसे न भरणा:यांच्या थेट घरार्पयत मोबाईलद्वारे संदेश जात असल्याने वाहतूक नियम मोडणा:यांवर चाप बसवण्यात यश आल्याचे दिसून आले आह़े मोबाईलच्या आकाराचे मशिन आणि त्याला जोडलेला छोटेखानी प्रिंटर अशा या दोन्ही यंत्रातून तात्काळ येणा:या माहितीमुळे नाक्यावरच्या वाहतूक कर्मचा:यांचा भारही हलका झाला आह़े जिल्ह्यात सध्या नंदुरबार शहरासह सर्व वाहतूक शाखांना हे मशिन्स देण्यात आले आहेत़ ऑनलाईन पद्धतीने होणा:या कामकाजामुळे तात्त्काळ दंड भरला जाऊन शासनदरबारी त्याची नोंदही होत आह़े येत्या काळात शहरातील वाहतूक पॉईंटवर नियुक्त केलेल्या सर्वच कर्मचा:यांच्या हाती हे ‘हँन्डी’ डिव्हाईस दिसून येणार असून पोलीस दल त्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचा:यांना प्रशिक्षण देत आह़े
नंदुरबार जिल्ह्यातील वाहतूक शाखेला 40 मशिन्सचा पुरवठा करण्यात आला आह़े यातील 23 मशिन्स हे नंदुरबार शहरातील 14 पॉईंटवर नियुक्त कर्मचा:यांना दिले आहेत़ 24 मे पासून आजअखेरीस 351 बेशिस्तांवर कारवाई झाली असून त्यांच्याकडून 59 हजार 800 रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आह़े एखाद्या वाहनचालकाने वाहतूक नियम मोडल्यानंतर किंवा तपासणीदरम्यान चलन मशिनद्वारे वाहनाचा फोटो काढला जातो़ यानंतर वाहन आणि मालकाची संपूर्ण माहिती समोर येत़े ऑनलाईन असलेल्या या प्रक्रियेत वाहनमालक गैरहजर असल्यास कारवाईचा संदेश पाठवला जातो़
24 मे पासून नंदुरबार शहर वाहतूक शाखेने वापरात आणलेल्या ई-चलन मशिनवर पहिल्या कारवाईत दंड झालेल्या वाहनधारकाने रोख रक्कम न भरता ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्डद्वारे दंडाची रक्कम भरण्यात आली होती़ पहिल्या दिवशी तीन केसेस करण्यात आल्या होत्या़ तिघांकडून जागेवर दंड वसुली करण्यात आली़ गत 24 दिवसात मशिनमध्ये एटीएम कार्ड टाकून 10 जणांनी कार्डद्वारे दंड भरला आह़े आतार्पयत एकटय़ा नंदुरबार शहरातील 351 केसेसमधून 59 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आह़े या कारवाईदरम्यान एका वाहनधारकाने सहा महिन्यांपूर्वी मुंबई येथे रश ड्राईव्हची केसही समोर येऊन त्याने न भरलेल्या दंडाची वसुली ई-चलन मशिनच्या माध्यमातून करण्यात आली आह़े