शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

एकेरी मार्गामुळे वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा गावानजीक रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा गावानजीक रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता एकेरी वाहतुकीमुळे येथे दिवसभरात अनेकवेळा वाहतूक ठप्प होत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी व ठेकेदाराने खाजगी माणसे नेमून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते शहादा मार्गावर प्रकाशा गावानजीक अवघ्या एक किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम सुरू आहे. चार ठिकाणी हे काम सुरू असून रस्त्याच्या एका बाजूचे काँंक्रिटीकरण झालेले आहे तर दुसऱ्या बाजूला काम अजून अपूर्ण आहे. वाहतुकीसाठी फक्त पाच मीटरचा रस्ता आहे. येथून एकाचवेळी दोन वाहने पास होऊ शकत नाही. या पाच मीटरच्या रस्त्यादरम्यान दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर लगेच वाहतूक ठप्प होते. याठिकाणी दिवसभर वाहतुकीचा खोळंबा होतो. या खोळंब्यामुळे प्रवासी व वाहनधारक अक्षरश: कंटाळले आहेत. नियमित ये-जा करणारे कर्मचारी व विद्यार्थ्यांना या समस्येमुळे वेळेवर कार्यालयात व शाळेत पोहोचता येत नाही. या समस्येवर उपाययोजना म्हणून ज्या ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे अशा ठिकाणी रस्त्याच्या एका टोकाला वाहने थांबवून दुसºया टोकाकडील वाहने काढावी लागतात. ती वाहने गेल्यानंतर पहिल्या टोकाकडील वाहने काढावीत. जोपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होत नाही तोपर्यंत याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी व त्यांच्या मदतीसाठी संबंधित ठेकेदाराने खाजगी माणसे नेमण्याची आवश्यकता आहे. एवढीही उपाययोजना केली तरी याठिकाणी वाहतुकीचा होणारा खोळंबा थांबणार आहे. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी याठिकाणी थांबतात. मात्र चार ठिकाणी एकेरी वाहतूक असल्याने कर्मचारी संख्या पुरेशी नाही. शिवाय वाहन चालकांमध्ये वाद झाल्यास ते वाद सोडविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मध्यस्थी करावी लागते. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत पोलिसांची संख्या वाढवून खाजगी ठेकेदारानेही माणसे नेमण्याची मागणी होत आहे.