लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील भगदरीचा वनवाईपाडा येथे शेतात गुरे आणल्याच्या वादातून एकास चौघांनी मारहाण केली़ दरम्यान युवकावर कुºहाडीने वार केल्याने तो जखमी झाला़ ही घटना १ आॅगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली होती़विवेश मानसिंग वळवी असे जखमीचे नाव असून शनिवारी शेतात गुरे का आणतो या कारणावरून सामनसिंग सोन्या वळवी, सोन्या भुंग्या वळवी, सामनसिंग भुंग्या वळवी, भरतसिंग सोन्या वळवी सर्व रा़ भगदरीचा वनवाईपाडा यांनी त्यास मारहाण केली होती़ यावेळी भरतसिंग वळवी याने त्याच्या जवळील कुºहाडीने विवेश वळवी याचे डोके, हात आणि पायावर मारुन जखमी केले होते़ त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार सुरू आहेत़ याबाबत मानसिंग भुंग्या वळवी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस कॉन्स्टेबल दिपक बुनकर करत आहेत़
कुºहाडीने वार करुन एकास केले जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:05 IST