शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

‘वन पोल वन डिपी’ला कोरोनामुळे लागला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षापासून सुरु केलेल्या वन पोल वन डिपी योजनेला कोरोनाने ब्रेक ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षापासून सुरु केलेल्या वन पोल वन डिपी योजनेला कोरोनाने ब्रेक लावला आहे़ यातून १ हजार २०० प्रस्तावित लाभार्थीं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून खरीपापूर्वी त्यांना या डीपीचे वाटप करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि धडगाव या चार तालुक्यांसाठी वीज वितरण कंपनीच्या शहादा विभागाकडून १ हजार २०० शेतकऱ्यांना वन पोल वन डिपीचा पहिल्या टप्प्यात लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते़ नियमित वीज बिलांचा भरणा करुन कंपनीला सहकार्य करणाºया अर्जदार शेतकºयांना प्रथम प्राधान्य देण्याचे यातून निश्चित करण्यात आले होते़ २०१९-२० या वर्षात चार तालुक्यात एक हजार २०० शेतकºयांना कनेक्शन मिळणे निश्चित होते़ परंतू कालांतराने सुरु असलेल्या अडचणींमुळे योजना बारगळत होती़ यातच देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने लॉकडाऊनची घोषणा झाली़ परिणामी वन पोल वन डिपी हा उपक्रमही थांबवण्यात आला आहे़ वीज कंपनीने ही योजना सुरु करण्यापूर्वी २०२० मध्ये लाभार्थी शेतकºयांच्या शेतात डीपी देण्याचे निर्धारित केले होते़ यानुसार अर्ज मागणी करुन डिमांड भरुन घेण्यात आली आहे़ शहादा विभागातील कोटा वाढवण्याबाबत शेतकºयांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यावर चर्चाही सुरु होती़ मात्र कोरोनामुळे ह्या सर्व चर्चा थांबल्या आहेत़ येत्या खरीप हंगामात शेतकºयांना पुन्हा जुन्या पद्धतीने पिकांचे संगोपन करण्याची वेळ येणार आहे़ बºयाच वेळा पाऊस लांबल्यास खरीप हंगामासाठी कृषीपंप हे सहाय्यकारी ठरुन पिकांना वाचवले जाते़ परंतू वीज कंपनीच्या ट्रान्सफामर्सचा पावसाळ्यात बोजवारा उडत असल्याचा प्रकार घडतो़ यामुळे या योजनेला पसंती होती़ शासनाने वीज कंपनीला आदेशित करुन योजना नव्याने सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे़ तळोदा आणि शहादा या दोन तालुक्यांसह दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यातील बागायतदार शेतकºयांना या स्वतंत्र डिपी कृषी क्षेत्रात प्रगतीची दारे खुलणार आहेत़जिल्ह्याच्या विविध भागात हा उपक्रम सुरु करण्याची मागणी आहे़ नंदुरबार, नवापुर या तालुक्यातही योजनेंतर्गत अर्ज केलेल्या शेतकºयांना डीपीचे वाटप करुन खरीप हंंगामात दिलासा देण्यात यावा अशी अपेक्षा करण्यात येत आहे़एकीकडे कोरोनामुळे वन पोल हा उपक्रम बंद करण्यात आला असताना दुसरीकडे कंपनीने दोन वर्षांपासून नवीन कृषीपंपांचे कनेक्शन देणे बंद केले आहे़ यातून अर्ज केलेल्या शेतकºयांना दिलासा मिळालेला नाही़ कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही़ नवीन कनेक्शनसाठी शेतकरी डिमांड भरण्यासही तयार आहेत़शहादा विभागातील चार तालुक्यात तब्बल २७ हजार कृषीपंप कनेक्शन आहेत़ यातील बºयाच शेतकºयांचे मागील थकीत रक्कम हा गंभीर प्रश्न आहे़ कंपनीकडून सरसकट रिडिंगची मोजणी करुन बिले पाठवली गेली असल्याने शेतकºयांच्या नावांसमोर थकबाकी दिसत आहे़ कंपनीने योग्य पद्धतीने बिले काढावीत किंवा सरसकट बिले माफ करण्यात यावी अशी शेतकºयांची मागणी आहे़ चार तालुक्यात आतापर्यंतची वीज बिलांची थकबाकी ही तब्बल ४१७ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे़वीज कंपनीकडून बºयाच शेतकºयांना वन पोल ऐवजी सोलरपंप योजनेत समाविष्ट होण्याबाबत विचारणा केली जाते़ परंतू जमिनीत खोलवर गेलेले पाणी सोलरमुळे बाहेर येण्यास अडचणी येतील असे शेतकºयांचे म्हणणे आहे़ यामुळे वन पोल यांतर्गत नवीन कोटा वाढवून शेतकºयांना लाभ देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे़४शहादा विभागात आतापर्यंत ७०० जणांना वन पोल वन डिपीचा लाभ दिल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात आले आहे़चार तालुक्यांमध्ये वन पोल वन डिपींतर्गत कनेक्शन देण्याचे काम लवकरच वेगाने सुरु होईल़ कोरोनामुळे कामकाजाला मर्यादा आल्या आहेत़ त्यावर मात करुन लवकरच शेतकºयांसाठी उपक्रम सुरु करणार असून तशी माहिती दिली जाईल़-किसन पवार, कार्यकारी अभियंता, शहादा