शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

धडगाव शहरातील रस्त्यांची एका रात्रीत दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी नंदुरबार जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर धडगाव येथील ज.पो वळवी विद्यालयाच्या आवारात हेलिपॅड ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी नंदुरबार जिल्हा दाैऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर धडगाव येथील ज.पो वळवी विद्यालयाच्या आवारात हेलिपॅड तयार करण्याचे काम बुधवारी रात्रीतून पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे हे आरोग्य यंत्रणांचा आढावा घेणार असल्याने ग्रामीण रुग्णालय तसेच शहरातील विविध भागात स्वच्छता करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालयात स्वच्छ बेडशीट, कचराकुंड्यांची स्वच्छता, स्वच्छतागृहांची सफाई करण्यात आली. सकाळपासून कर्मचारी वाऱ्याच्या वेगाने धावपळ करत कामे करत असल्याने याठिकाणी दाखल रुग्णही बुचकाळ्यात पडले होते. दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून लसीकरण सुविधेचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी लसीकरण कक्ष तयार करण्याचे कामही होत असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या दाैऱ्यामुळे दुर्गम भागात उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुसऱ्यांदा धडगाव येथे येत असून यापूर्वी ते २०१९ मध्ये झालेल्या निवडणूक प्रचारासाठी आले होते.

मुख्यमंत्री हे हेलिपॅडवरुन मोटारीने शहरात येणार असल्याने रोझरीपाडा भागातील खड्डेमय रस्ता पूर्णपणे नव्याने करण्यात आल्याचे दिसून येत आहे. खड्ड्यांमध्ये खडी व डांबर टाकून त्यावर रोलर फिरवत पुन्हा डांबर टाकून रस्ता चकचकीत करण्याचे काम रात्री सुरु होते. सकाळीही काही भागातील खड्डे बुजवण्यात आले. दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत इतर मंत्र्यांची येण्याची शक्यता असल्याने धडगाव ते मोलगी दरम्याच्या रस्त्याचे कामही सुरु असल्याची माहिती आहे.