शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्ड फ्लू’चा कहर; दहा लाख कोंबड्या मारणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 02:39 IST

नवापूरमध्ये ५० कोटींचे नुकसान

- रमाकांत पाटीलनंदुरबार : महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेल्या नवापुरात १५ वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा बर्ड फ्लू पक्ष्यांवरील संसर्गजन्य साथ पसरली आहे. या साथीमुळे  नवापूर व परिसरातील १० लाख कोंबड्या  शास्रोक्त पद्धतीने नष्ट करून त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या साथीमुळे पोल्ट्री व्यावसायिकांचे सुमारे ५० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. धुळे आणि  जळगावत जिल्ह्यातही या आजाराचे काही प्रमाणात लोण पसरले आहे.नवापूर येथे पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुकूल वातावरण असल्याने माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी प्रोत्साहन दिले. तीन दशकांपासून येथे माेठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे. मात्र २००६ मध्ये देशात पहिल्यांदाच येथे बर्ड फ्लूची साथ आली. त्यावेळी तब्बल पाच लाख पक्षी नष्ट करण्यात आले होते. शासनाने व्यावसायिकांना २० कोटींची मदत दिली होती. त्या आजारातून सावरण्यास या व्यवसायाला दाेन वर्षे लागली होती. पुन्हा नव्याने हा व्यवसाय उभारीस आला. तेव्हापेक्षा पोल्ट्री व्यावसायिकांची संख्या कमी झाली. पण कोंबड्यांची संख्या मात्र २००६च्या तुलनेत आता दुप्पट झाली आहे. हरियाणा कनेक्शन शासकीय सर्वेक्षणानुसार या नुकसानीचा अंदाज ३० कोटीपर्यंत आहे. त्यासंदर्भात सूक्ष्म सर्वेक्षणही सुरू आहे. या परिसरात फेरफटका मारल्यानंतर या आजाराचे हरियाणा कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे. एका पोल्ट्री व्यावसायिकाने हरियाणात अतिशय स्वस्तदरात पक्षी मिळाल्याने डिसेंबरमध्ये २० हजार पक्षी आणले होते. मात्र हे पक्षी आजारी होते. पोल्ट्री धारकांना २००९ नुसार भरपाई दिली जाते. त्यात साधारणपणे ९० रुपये प्रति पक्षी  दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात तीन ते चारपटीने खर्च झाला आहे, पशुखाद्याचे दरही खूप आहेत. ही मदत खूपच कमी असल्याने पोल्ट्री धारक पुन्हा उभाच राहू शकत नाही.- अरीफभाई बलेसरिया, अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन, नवापूरबर्ड फ्लूबाबत २००६ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. प्रशासन त्यासाठी सज्ज झाले आहेत. पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- डॉ. राजेंद्र भारुड,जिल्हाधिकारी, नंदुरबारधुळे : बर्ड फ्लूचा शिरकावधुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे. बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेहेरगावच्या एक किलोमीटरपर्यंतचा भाग बाधित क्षेत्र, तर १० किलोमीटरचा परिसर हा निगराणीक्षेत्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तालुकानिहाय समितींचे गठन करण्यात आले आहे, तर दोन पोल्ट्रीफार्म सील केले आहेत. २,४७५ पक्षी रविवारी नष्ट केले.

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू