लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सव्वाचार लाखांची दारू आणि दहा लाखांचे वाहन असा एकुण १४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नंदुरबारनजीक खामगाव शिवारात पकडला. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे.महाराष्टÑात विक्रीस प्रतिबंधीत व दमन राज्यात जाणारा दारू साठा असलेली ट्रक (क्रमानक एमएब १० ए.डब्ल्यू. ७०८५) पथकाने २६ रोजी रात्री नंदुरबार-नवापूर रस्त्यावरील खामगाव शिवारात पकडला. वाहन पकडताच चालक पुष्पेंद्रसिंह प्रभूसिंह चौहान रा.राजसमद (राजस्थान) हा अंधाराचा फायदा घेवून पळू लागला. अधीक्षक युवराज राठोड यांनी झडप घालून त्याला पकडले. बंदीस्त असलेल्या या ट्रकमध्ये व्हिस्की, बियर चे बॉक्स मिळून आले. त्यांची बाजारभावनुसार किंमत चार लाख ३२ हजार १९२ रुपये इतकी आहे. तर वाहनाची किंमत दहा लाख रुपये आहे. एकुण १४ लाख ३२ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. चालकास अटक करण्यात आली आहे. सध्या मुंबई-आग्रा महामार्गाचा शॉर्टकट म्हणून शिरपूरहूनन शिंदखेडा, दोंडाईचा, नंदुरबार, विसरवाडीमार्गे गुजरातकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होऊ लागला आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड, निरिक्षक संजय परदेशी, दुय्यम निरिक्षक शैलेंद्र मराठे, जवान भूषण चौधरी, हितेश जेठे, संदीप वाघ, धनराज पाटील, मानसिंग पाडवी, हंसराज चौधरी यांनी केली.
चार लाखाच्या दारूसह दहा लाखांचा ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 12:13 IST