शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

तीन कारखान्यांकडून एक लाख 85 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगामाला गती आली असून अवघ्या महिनाभरात तीनही साखर कारखान्यांनी दोन लाख 17 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील साखर हंगामाला गती आली असून अवघ्या महिनाभरात तीनही साखर कारखान्यांनी दोन लाख 17 हजार 308 टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून एक लाख 84 हजार        558 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.जिल्ह्यात यंदा मोठय़ा प्रमाणावर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने सर्वानाच त्याची चिंता लागून            आहे. विशेषत: उसाचे उत्पादन            घटेल, अशी ऊस उत्पादकांना व साखर कारखाना प्रशासनाला भीती आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा जिल्ह्यातील तीनही साखर कारखाने गेल्या हंगामाच्या तुलनेत लवकर सुरू झाले. सातपुडा साखर कारखाना           30 ऑक्टोबरला, आदिवासी कारखाना 2 नोव्हेंबर तर समशेरपूरचा कारखाना 4 नोव्हेंबरला सुरू झाला. त्यातच पहिल्या आठवडय़ातच शेतकरी संघटनेच्या आंदोलनाने गाळपावर परिणाम झाला. त्यानंतर मात्र गाळप नियमित सुरू                झाल्याने हंगामाला गती आली आहे. यावर्षी विशेषत: मराठवाडा व इतर भागात दुष्काळाची स्थिती असल्याने ऊस तोडणीसाठी तीनही कारखान्यांकडे मजूर मोठय़ा               संख्येने आल्याने नियोजनाप्रमाणे कारखान्याचे ऊस गाळप सुरू झाले आहे.सातपुडा साखर कारखान्याने 3 डिसेंबर्पयत 82 हजार 270 टन उसाचे गाळप केले असून 8.52 च्या सरासरीने 70 हजार 75 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. आदिवासी सहकारी साखर कारखान्याने 33  हजार 878 टन उसाचे गाळप केले असून 8.06 च्या सरासरीने 27            हजार 300 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. समशेरपूर येथील कारखान्याने एक लाख एक               हजार 160 टन उसाचे गाळप केले असून 8.62 च्या सरासरीने 87 हजार 183 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.एकूण जिल्ह्याची स्थिती पाहता तीनही कारखान्यांतर्फे दोन लाख 17 हजार 308 टन उसाचे गाळप झाले असून सरासरी 8.49 च्या उता:याने साखरेचे एक लाख 84 हजार         558 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखाने पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहेत. समशेरपूर येथील कारखान्याची गाळप क्षमता केवळ अडीच हजार मेट्रीक टन असली तरी या कारखान्यातर्फे रोज सरासरी चार हजार टन उसाचे गाळप होत आहे तर सातपुडा साखर कारखानाही चार हजार टन उसाचे गाळप करीत आहे. यावर्षी कारखान्यातर्फे मोठय़ा प्रमाणावर गाळप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.