नंदुरबार : चौपाळे शिवारात धुळे रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर एक जखमी झाला़ सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़चौपाळे येथील मधुकर नंदा महाजन व हिंमत विठ्ठल कोळी हे दोघेही दुचाकीने चौपाळे येथून दोंडाईचा गावाकडे जात असताना निलेश पेट्रोलपंपाजवळ अज्ञात वाहनाने मागून धडक दिली़ भरधाव वेगात वाहनाने जबर धडक दिल्याने मधुकर महाजन हे जागीच ठार झाले तर हिंमत कोळी हे गंभीर जखमी झाले़ घटनेनंतर चौपाळे परिसरातील नागरिकांनी मदत कार्य करत दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते़ परंतू तोवर मधुकर महाजन यांचा मृत्यू झाला होता़ जखमी कोळी यांच्यावर उपचार सुरु आहेत़याबाबत योगेंद्र मधुकर माळी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करत आहेत़
धुळे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:17 IST