शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी येथे शेतातील घरात दगडाने ठेचून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी/खांडबारा : शेतातील घरात एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना श्रावणी, ता.नवापूर शिवारात घडली. सोमवारी दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी/खांडबारा : शेतातील घरात एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना श्रावणी, ता.नवापूर शिवारात घडली. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपी व खुनाचे कारण अज्ञात असून विसरवाडी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार, नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रहिवासी भटूलाल काशिनाथ परदेशी (५०, रा.खांडबारा) यांची श्रावणी शिवारात शेती आहे. या शेतात त्यांनी घर बांधले असून शेताची रखवाली करण्यासाठी ते त्याठिकाणी रात्री मुक्कामी राहत होते. त्यांच्या मुलीला विवाहासाठी पाहण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी एक स्थळ येणार होते. त्यासाठी यांचा मुलगा मिलिंदकुमार भटूलाल परदेशी हे त्यांच्या वडिलांना बोलावण्यासाठी शेतात गेले असता त्यांचे वडील भटूलाल काशिनाथ परदेशी हे रक्तबंबाळ अवस्थेत तेथे मृत अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणासाठी त्यांना दगडाने डोक्यात व तोंडावर ठेचून त्यांचा खून केल्याचे निदर्शनास आले.घटनास्थळी खाटेवर, गादीवर, भिंतीवर व जमिनीवर रक्ताचा सडा पडलेला होता. रक्ताने माखलेला दगडदेखील तेथे पडले होता.याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात मिलिंदकुमार भटूलाल परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीक निरीक्षक गणेश न्हायदे हे करीत आहेत.