लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने एकजण जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची घटना शहादा-प्रकाशा रस्त्यावर लांबोळानजीक १७ रोजी घडली.कालुसिंग भायला बारेला, रा.दोंदवाडा, ता.पानसेमल असे मयताचे नाव असून उत्तम गोवर्धन मोरे व गणेश तुळशीराम साठे हे जखमी झाले आहेत. कालुसिंग यांनी आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव चालवून नेत असतांना समोरून येणाऱ्या दुसºया दुचाकीला जबर धडक दिली. त्यात कालुसिंग बारेला स्वत: जागीच ठार झाले तर उत्तम मोरे व गणेश साठे हे जखमी झाले.
दुचाकींच्या धडकेत एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 12:14 IST