लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील निंबीपाटी येथे महिलेस मारहाण केल्याच्या संशयातून एकास आठ जणांनी बेदम मारहाण केली़ 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली़ निंबापाटी येथील बाबू नकटय़ा वसावे याच्यावर गावातीलच भाऊजी रावल्या वळवी याने पत्नीस मारहाण केल्याचा संशय घेतला होता़ यातून भाऊजी वळवी, रामा भाऊजी वळवी, गोमा भाऊजी वळवी, शंकर भाऊजी वळवी, वंकर भाऊजी वळवी, दिवल्या सोन्या वळवी, गोमा नोकटय़ा वळवी, वैजंताबाई गोमा वळवी सर्व रा़ निंबापाटी यांनी बाबू वसावे यास बेदम मारहाण केली होती़ याबाबत बाबू वसावे यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आठ संशयितांविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़
महिलेला मारल्याच्या संशयातून निंबापाटी येथे एकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 12:39 IST