नंदुरबार : भरधाव प्रवासी रिक्षा उलटल्याने एकजण जागीच ठार तर चारजण जखमी झाल्याची घटना उंबर्डी, ता.नवापूर येथे ११ रोजी सकाळी घडली.किसन सखाराम गावीत (२५) रा.उंबर्डी, ता.नवापूर असे मयत प्रवाशाचे नाव आहे. नवापूर तालुक्यातील दुर्गम भागातील उकळापाणी ते उंबर्डी रस्त्यावरील तीव्र वळणावर हा अपघात झाला. लाजरस शांतू गावीत, रा.गताडी हा आपल्या ताब्यातील प्रवासी रिक्षामध्ये (क्रमांक जीजे २६-टी ६६०) प्रवासी घेवून भरधाव जात होता. उंबर्डी नजीकच्या वळणावर त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा उलटली. त्यात दाबला जावून किसन गावीत हा जागीच ठार झाला तर पाण्या भोंगड्या गावीत, रजूबाई पाण्या गावीत, शर्मिला विश्वास गावीत, रवी रमेश गावीत सर्व रा.उंबर्डी हे जखमी झाले. पाण्या गावीत यांच्या फिर्यादीवरून चालक लाजरस गावीत विरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
नवापुरातील अपघातात एक ठार, चारजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:54 IST