शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ओहवा येथे एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:08 IST

चौघांविरोधात गुन्हा : बैलाचा मोबदला मागिल्याचा राग

नंदुरबार : जुन्या भांडणाची कुरापत काढून एकास बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी अक्कलकुवा तालुक्यातील ओहवा येथे घडली़ याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ओहवाचा पाटीलपाडा येथील सोमा भामटा वसावे यांचा बैैल राया भामटा वसावे हा घेऊन गेला होता़ दरम्यान बैैल मरण पावला होता़ यामुळे सोमा वसावे यांनी राया वसावे यांच्याकडे मोबदला मागितला होता़ याचा राग आल्याने राया वसावे, टिमकाबाई राया वसावे, वजऱ्या वसावे, विकºया राया वसावे सर्व रा़ पाटीलपाडा यांनी सोमा वसावे व त्यांच्या कुटूंबातील सदस्याला हाताबुक्क्यांनी मारहाण केली़ मारहाणीदरम्यान राया वसावे याने हातातील दगडाने वार केल्याने सोमा वसावे यांच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली़ मारहाण झाली त्यावेळी वसावे यांच्या घरासमोर गावपंच बसून या विषयावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते़ घटनेनंतर वसावे व त्यांच्या कुटूंबातील सदस्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ उपचार पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडवी करत आहेत़