लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव ट्रॅक्टर खड्डयात उलटून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाल्याची घटना वडफळी, ता.नवापूर येथे घडली. याबाबत विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुनील धारसिंग वसावे (२५) रा.वडफळी, ता.नवापूर असे मयताचे नाव आहे. १७ रोजी सकाळी ११ वाजता ही घटना घडली. चालक सुनील वसावे याने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १८-०२ बी ९२९२) भरधाव चालवून नेत असतांना वडफळी गावाच्या रस्त्यावर डीपीनजीक उकीरड्यावर त्याच्याकडून ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्डयात पडले. यात स्वत: चालक सुनील वसावे यांना गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.याबाबत हवालदार नरेंद्र वळवी यांनी फिर्याद दिल्याने विसरवाडी पोलिसात अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार वळवी करीत आहे.
भरधाव ट्रॅक्टर उलटल्याने एकजण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 11:56 IST