लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करून एकुण एक कोटी 42 लाख 28 हजार 36 रुपयांची वसुली करण्यात आली. येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. टी.मलिये, न्या.एल.डी.गायकवाड, न्या.जी.एच.पाटील, न्या.व्ही.जी.चव्हाण, एस.ए.विराणी, एन.बी.पाटील यांच्यासह पॅनेल प्रमुख चिंतामनी आर.सोनार, पी.एन.इंद्रजीत, डी.एस.पाटील, अॅड.सीमा खत्री, शारदा पवार, यु.एच.केदार, एस.ए.सोनार, व्ही.बी.शहा, एच.एम.गांगुर्डे आदी उपस्थित होते.लोकअदालतीत प्रलंबीत व दाखलपूर्व प्रकरणी सुनावणीसाठी होती. प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी केसेस 55 निकाली काढण्यात आले. त्यातून सहा लाख 23 हजार 878 रुपयांची रक्कम वसुल करण्याचे आदेश देण्यात आले. मोटार अपघाताची 13 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून 21 लाख तीन हजार रुपयांची वसुलीचे आदेश. धनादेश अनादराचे 37 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून 29 लाख 86 हजार 828 रुपयांची वसुलीचे आदेश देण्यात आले. कौटूंबिक वादाची दहा प्रकरणे तर फौजदारी स्वरूपाची आठ प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकुण 123 प्रकरणे निकाली काढून 57 लाख 13 हजार 706 रुपयांची वसुलीचे आदेश देण्यात आले.दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुलीची 79 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यातून 84 लाख 67 हजार 317 रक्कमेची वसुलीचे आदेश देण्यात आले. वीज थकबाकी वसुलीची आठ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून 22 हजार 510 तर बीएसएनएल व इतर फायनान्सची 22 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यातून 85 लाख 14 हजार 330 रुपयांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले.सर्व मिळून एकुण 232 प्रकरणे निकाली काढण्यात येवून एक कोटी 42 लाख 28 हजार 36 रुपयांच्या रक्कमेची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले.
राष्ट्रीय लोकअदालतीत मोठय़ा प्रमाणावर दावे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाभरातून पक्षकार उपस्थित होते. सामोपचाराने आणि तडजोडीतून प्रकरणे मिटविण्यात येत होते. परिसरात गर्दी झाली होती.