नवापूर : नवापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दमण बनावटीची सहा लाख ७१ हजार रुपये किमतीच्या दारुसाठ्यासह ११ लाखांचा ऐवज जप्त केला असून एकास अटक केली आहे.पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना पिकअप वाहनातून दमण बनावटीच्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती़ यानुसार किलवनपाडा गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला होता़ दरम्यान एमएच ०४ एफडी २४७१ ही पीकअप गाडी थांबवून तपासणी केली असता त्यात सहा लाख ७१ हजार ५२० रुपये किमतीची विदेशी दारु मिळून आली. चार लाख ५० हजार रुपयांचे वाहन व सहा लाख ७१ हजाराची दारु असा अंदाजे ११ लाख २१ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन चालक कैलास रतीलाल मावची रा. खेकडा ता. नवापूर यास ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, उपनिरीक्षक शिवाजी नागवे, संदिप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश थोरात, प्रशांत यादव, अनिल राठोड, जयेश बाविस्कर, नितिन मराठे, रितेश इंदवे, हेमंत सैंदाणे, पंकज सूर्यवंशी आदींनी केली़
नवापूर तालुक्यात सहा लाखाच्या अवैध विदेशी मद्यासह एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 11:43 IST