शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा शहरातील मोकाट जनावरांच्या हल्ल्यात वृध्द गंभीर जखमी 

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: January 23, 2024 18:08 IST

नंदुरबार : तळोदा शहरातील गणपती गल्ली परिसरात मोकाट जनावराने केलेल्या हल्ल्यात 66 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची  घटना सोमवारी ...

नंदुरबार : तळोदा शहरातील गणपती गल्ली परिसरात मोकाट जनावराने केलेल्या हल्ल्यात 66 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची  घटना सोमवारी घडली.हा चित्तथरारक हल्ला सीसीटीव्ही कॅमेरात कैद्  झाला असून नागरिकांनी मोकाट जनावरांपासून सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,तळोदा शहारातील गणपती गल्लीत एका घराच्या सामोरं दोन मोकाट जनावरे गाय व बैल हे उभे होते.त्याचवेळी रस्त्यावरून दुपारच्या सुमारास दिगंबर सोनार हे कार्यक्रमात करत होते त्यावेळी घरासमोर उभे असलेल्या दोन जनावरांपैकी एका बैलाने त्यांना शिंगांच्या सहाय्याने उचलून अक्षरशः खाली पडले. क्षणभर जवळपास उभ्या असणाऱ्या लोकांना काय झाले काहीच करायला मार्ग नाही मात्र, सोनार यांच्या डोक्यातून रक्त बाहेर यायला लागल्यावर घडलेला प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यावर ते मदतीसाठी पुढे आले व त्यांनी दिगंबर सोनार यांना उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले या हल्ल्यात दिगंबर सोनार यांच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समजते.

   खानदेशी गल्लीमध्ये देखील अशा मोकाट जनावरांनी काही दोन-तीन तरुण व लहान मुलांवर देखील हल्ले केल्याचे प्रकार समोर आले आहेत.

       दरम्यान,बैलाने वृद्धावर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असून पालिका प्रशासनाने याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या झुंडीमुळे अनेक वाहनचालक देखील यापूर्वी जायबंदी झाल्याच्या अनुभव आहे. मोकाट फिरणाऱ्या या प्राण्यांच्या उपद्रवाच्या सामना सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो त्याचप्रमाणे संध्याकाळच्या सुमारास देखील वाहन चालकांना मोकाट फिरणाऱ्या जनावरांपासून धोका निर्माण झालेला असतो. यावर कोणतीच ठोस उपाययोजना पालिका प्रशासनाकडून अद्याप करण्यात आलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे.