शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

नवापुर चेकपोस्टवर सात हजार परप्रांतीयांची सोय करताना अधिकाऱ्यांचे ‘जागते रहो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : राज्याच्या सीमेवर परप्रांतीय मजुर व कामगार यांचा मोठा जत्था काल सायंकाळी अचानक दाखल झाल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापुर : राज्याच्या सीमेवर परप्रांतीय मजुर व कामगार यांचा मोठा जत्था काल सायंकाळी अचानक दाखल झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. सात हजाराहुन अधिकच्या जमावाची सोय करता करता अधिकाऱ्यांना रात्रभर जागरण करावे लागले.राज्यशासनाने मजूर व कामगार तथा सामान्य माणसासाठी एसटीची सोय उपलब्ध करुन दिल्याने पायपीट करुन घरवापसी करणाºयांची चांगली सोय झाली आहे. बिहार, मध्यप्रदेश, ओडीसा व राज्यातील कामगार तथा मजूर वर्ग मोठ्या संख्येने गुजरातमध्ये अडकले होते. नवापुर आगारावर ही जबाबदारी आल्याने नियोजनबध्द पध्दतीने लालपरीची सेवा उपलब्ध करुन दिली जात होती. मजूर व कामगार खाजगी वाहनांमधुनही प्रवास करीत होते. लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात खाजगी प्रवासी वाहतूकीवर निर्बंध टाकण्यात आल्याने लोकांना एसटी शिवाय पर्यायच उरला नाही. मंगळवारी सायंकाळी असंख्य वाहनांमधून हजारो नागरिक गुजरात सीमेवर उतरुन राज्य सीमा परिवहन तपासणी नाक्यावर दाखल होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता ही संख्या सात हजाराच्या पार झाली. गुजरात मधील हॉटस्पॉट भागातील नागरीकही त्यात समाविष्ट होते. सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडत असल्याने नंदुरबार येथुन अतिरिक्त पोलीस बल मागविण्यात आले. अचानक मोठा जमाव आल्याने परिवहन विभागाच्या नियोजनाचा खोळंबा झाला. प्रशासनाला आधीच केलेल्या नियोजनात वेगळे नियोजन करावे लागले. त्यातही वाहनांची तेवढी संख्या नसल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील इतर आगारांमधून वाहने बोलाविण्यात आली. या सर्व प्रक्रियांसाठी वेळ गेल्याने जमावास रोखुन धरण्यात आले. पोलीस प्रशासन व आगारातील अधिकारी कर्मचारी यांना तर ही कसरत पार पाडतांना रात्र कुठे पसार झाली हे देखील कळाले नाही.सीमा परिवहन तपासणी नाक्याचे संचालन एका खाजगी कंपनीकडून केले जाते़ येथील आधुनिक सोयी सुविधा नावालाच आहेत. तेथील सार्वजनिक स्वच्छतागृह बंद ठेवण्यात आल्याने आबालवृध्द व महिलांचे हाल झाले़दरम्यान नवापुर येथून २५ हजार लोकांना इच्छितस्थळी पोहोचविण्यात आले आहे. आजही सीमा परिवहन तपासणी नाक्यावर दोन हजाराचा जमाव होता.