शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अधिका:यांवर हल्ला करणा:यांविरोधात गुन्हा, पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांच्यासह सात अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ सलसाडी येथे सोमवारी सचिन मोरे या सहावीतील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सलसाडी ता़ तळोदा येथील शासकीय आश्रमशाळेत प्रकल्प अधिकारी विनय गौडा यांच्यासह सात अधिकारी व कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ सलसाडी येथे सोमवारी सचिन मोरे या सहावीतील विद्याथ्र्याचा मृत्यू झाल्यानंतर भेट देऊन पाहणी करत असताना 10 ते 15 जणांच्या जमावाने  प्रकल्प अधिकारी विनय गौडा, तहसीलदार योगेश चंद्रे, अक्कलकुवा विभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रकाश मेढे, सहायक पोलीस निरीक्षक यादव भदाणे, आश्रमशाळेचे अधिक्षक भूषण रविंद्र सैंदाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दारासिंग गावीत, पोलीस कॉन्स्टेबल देविदास विसपुते यांच्यावर थेट हल्ला करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली होती़ या मारहाणीत प्रकल्प अधिकारी गौडा व तहसीलदार चंद्रे यांनी दुखापत झाली तर उर्वरित अधिकारी कर्मचारी यांना मुका मार लागला होता़ घटनेनंतर रात्री उशिरा सहायक पोलीस निरीक्षक भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 15 जणांविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सर्व संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत़ तपास पोलीस निरीक्षक चव्हाण हे करत आह़े घटनेनंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपअधिक्षक प्रकाश मेढे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली होती़ दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार जमावाने शासकीय कामात अडथळा आणून जमावबंदी आदेशांचे उल्लंघन केल्याचे म्हटले आह़े मयत विद्यार्थी सचिन मोरे याच्यावर मंगळवारी दुपारी गढीकोठडा ता़ तळोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आल़े यावेळी त्याच्या कुटूंबियांनी आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली़ सोमवारी त्यांनी प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन मदतीची मागणी केली होती़ घटनेनंतर सलसाडी आश्रमशाळेबाहेर पोलीस बंदोबस्त कायम असून आश्रमशाळेत तुरळक विद्याथ्र्याची उपस्थिती होती़