लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महसूल कर्मचा:यांच्या संपाचा शेवटचा टप्पा हा बेमुदत कामबंद आंदोलनाचा असून त्याला गुरुवारपासून सुरुवात झाली. परिणामी महसूलची अनेक कार्यालये गुरुवारी ओस पडली होती. शासकीय कामकाजावर त्याचा परिणाम दिसून आला. कर्मचा:यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचा:यांनी गेल्या काही दिवसांपासून विविध टप्प्यात आंदोलन सुरू केले आहे. शेवटचा आणि निर्णायक टप्पा म्हणून गुरुवार, 5 सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले होते. तसे निवेदन देखील यापूर्वीच शासनाला आणि प्रशासनाला देण्यात आले होते. परंतु तरीही मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कर्मचा:यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य महसुल कर्मचारी संघटनेने शासनाने तत्वत: मान्य केलेल्या मागण्यांचा सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी होवूनही शासन निर्णय न काढल्याने 11 जुलैपासुन टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरू केले आहे. कर्मचा:यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने यापुर्वीच्या चार टप्यात व्दार निदर्शने, घंटानाद, ऑगस्ट क्रांती दिनी एक तास जास्तीचे काम व 28 ऑगस्ट रोजी सामुदीयक रजा आंदोलन केले होते. तरीदेखील शासन कर्मचा:यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. 31 रोजी लाक्षणीक संप पुकारला होता. आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यावेळी संदिप परदेशी, हेमंत देवकर, मिलींद निकम, महेंद्र कदमबांडे, संदिप रामोळे, प्रभाकर राठोड, हिरालाल गुले, गणेश बोरसे, ओम कुळकर्णी, दिनेश रणदिवे आदींसह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
कर्मचारी संपामुळे कार्यालये पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:43 IST