लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करणा:या चौघांविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एप्रिल ते 26 जुलै र्पयत हा प्रकार सुरू होता. नंदुरबारातील दुधाळे शिवारात राहणा:या एका 43 वर्षीय व्यक्तीला लवकुश गवळी, रा.धुळे व इतर तिघांनी अलि फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसे करायचे नसेल तर खंडणीची मागणी केली. यासाठी त्यांनी संबधीताच्या घरी जावून त्यांच्या प}ीलाही धमकवले. यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या संबधीत व्यक्तीने शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून लवकुश गवळी, रा.धुळे व त्याच्या इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार के.डी.चौधरी करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयीताच्या शोधसाठी लवकरच पथक पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत खंडणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:23 IST