नंदुरबार : जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात आढळून येणाऱ्या क्षयरोगींना उपचार देण्यासह त्यांची देखभालही करण्याचा प्रयत्न केला जातो. यातून जिल्ह्यात आढळून येणाऱ्या सर्वच रुग्णांना निक्षय पोषण योजनेचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती क्षयरोग विभागाकडून देण्यात आली आहे.
टीबीची लक्षणे काय?
सामान्यत: १५ दिवसांपेक्षा जास्त काळ असलेला खोकला टीबीचे लक्षण आहे. थुंकीवाटे रक्त येणे, वजन कमी होणे, १५ दिवसांपेक्षा अधिक काळ असलेला ताप बरा न होणे तसेच मानेवर गाठी असणे ही टीबीची लक्षणे आहेत. नागरिकांनी अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने रुग्णालयांमध्ये तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त ९० महिन्यांत टीबीमुक्त
नंदुरबार जिल्ह्यात महिन्याला सरासरी ९० जण हे टीबीमुक्त होत असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात दरवर्षी टीबी अर्थात ट्युबरक्युलोसिसचे रुग्ण आढळून येतात. या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासह त्यांना महिन्याला ५०० रुपयांची मदत देण्यात येते.
जिल्ह्यातील टीबीच्या रुग्णांना डीबीटीमार्फत दर महिन्याला रक्कम दिली जाते. सर्व रुग्णांना ही रक्कम वेळेवर मिळत आहे.
-डाॅ. अभिजित गोल्हार
जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी