लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ता़ नवापुर येथे दिवाळीच्या सुटीत बंद असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेतील पोषण आहाराचा तांदूळ व तेल चोरीस गेल्याची घटना गुरुवारी उजेडात आली़ चोरटय़ांनी शाळेचा दरवाजा तोडून ही चोरी केली आह़े विसरवाडी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या पोषण आहार ठेवलेल्या खोलीचा दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे गुरुवारी नागरिकांना दिसून आले होत़े त्यांनी मुख्याध्यापकांना माहिती दिली होती़ शिक्षक व मुख्याध्यापकांनी येऊन पाहणी केली असता, 25 किलो तांदूळ आणि 6 लीटर तेल असा 1 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे दिसून आल़े याबाबत दादाभाऊ बाबुराव पाटील रा़ साक्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक अनिल राठोड करत आहेत़ केंद्र शाळेत झालेल्या चोरीदरम्यन चोरटय़ांनी शाळेची कार्यालयीन कागदपत्रे, साहित्य आणि चटणी व मसाला फेकून नुकसान केल्याची माहितीही देण्यात आली आह़े विसरवाडी व नवापुर परिसरात दीड महिन्यापासून किरकोळ चो:यांना ऊत आला आह़े महामार्गावरील ढाबे तसेच हॉटेल्स परीसरातून दुचाकी चोरीसह नवापुर परिसरात भुरटय़ा चो:या वाढल्याने चिंता वाढल्या आहेत़
विसरवाडी जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:56 IST