शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

एनआरएचएमने दुर्गम भागात बांधलेल्या इमारती निकृष्टच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 11:34 IST

जिल्हा परिषद : स्थायीच्या सभेत सदस्यांचा आरोप

नंदुरबार : एनआरएचएमअंतर्गत दुर्गम भागात आरोग्य विभागाने बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती ह्या निकृष्ट दर्जाच्या असून त्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आली़ मागणीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी संबधितांची चौकशी करण्याचे तोंडी आदेश अधिकाऱ्यांना दिले़जिल्हा परिषदेच्या मिटींग हॉलमध्ये ही सभा घेण्यात आली़ सभेस उपाध्यक्ष सुहास नाईक, अर्थ समिती सभापती दत्तू चौरे, समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, उपमुख्य कार्यकारी मनिष सांगळे, सदस्य रतन पाडवी, सागर तांबोळी यांच्यासह सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते़ सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा रजनी नाईक होत्या़ प्रारंभी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले़ यानंतर विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला़ आयत्या वेळच्या विषयात पाणीटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडून विंधनविहिरींसाठी ५० लाख रुपयांचा निधी यंदा वितरीत करण्यात आला होता़ यांतर्गत झालेल्या कामांबाबत विचारणा करण्यात आली़ या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असल्याचा आरोप समितीच्या सदस्यांकडून करण्यात आला़ ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता पी़टी बडगुजर यांनी योग्य माहिती न दिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली़ धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात विंधनविहिरींची खोदाई न करताच बिले काढल्याचा आरोप उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी केला़ तर सदस्य रतन पाडवी यांनी गेल्या वर्षाची कामे यंदा सुरुच असल्याची माहिती दिली़ पाणीटंचाई गंभीर स्वरुप धारण करत असताना दोन्ही तालुक्यात केवळ ४० विंधनविहिरींची कामेच पूर्ण झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली गेली़मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी खोदाईचे कंत्राट दिलेल्या ठेकेदारांची चौकशी करणार असून दुर्गम भागाकडे विशेष लक्ष देणार असल्याचेही आश्वासन दिले़ तसेच टंचाई काळात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेणार असल्याची माहितीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली़