नंदुरबारात घरपट्टीत यंदा वाढ नाही दहा टक्के मिळणार सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:31 PM2020-10-17T12:31:47+5:302020-10-17T12:32:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॅाकडाऊन आणि कोरोनामुळे शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत भरली तर दहा ...

No increase in house rent in Nandurbar this year | नंदुरबारात घरपट्टीत यंदा वाढ नाही दहा टक्के मिळणार सूट

नंदुरबारात घरपट्टीत यंदा वाढ नाही दहा टक्के मिळणार सूट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॅाकडाऊन आणि कोरोनामुळे शहरवासीयांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत भरली तर दहा टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.  याशिवाय पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे तीन महिन्याचे भाडे देखील माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.    
पालिकेची सर्वसाधारण सभा अध्यक्षा रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी ऑनलाईन झाली. सभेच्या अजेंड्यावर एकुण १७ विषय होते. ते सर्व मंजुर करण्यात आले. 
दहा टक्के घरपट्टी माफ
कोरोना व लॅाकडाऊनमुळे अनेक कुटूंबांची आर्थिक परिस्थिती खालावली. त्यामुळे घरपट्टीत काही प्रमाणात सूट देण्याची मागणी  करण्यात येत होती. याबाबत     पालिका देखील गांभिर्याने विचार करीत होती. विरोधकांनी देखील मागणी लावून धरली. त्यामुळे पालिकेने घरपट्टीची नोटीस मिळाल्यानंतर महिनाभराच्या आत एकुण रक्कम एकाचवेळी भरली तर त्यात दहा टक्के सूट देण्याचाही निर्णय घेण्यात आला. 
याशिवाय पुर्नरमुल्यांकनात कुठलीही वाढ न करण्याचा निर्णयही घेण्यात आला. दरम्यान, विरोधकांनी सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याची मागणी केली होती. 
दुकान भाडे माफ
पालिकेच्या मालकीच्या दुकान गाळ्यांमधील भाड्याने दिलेली दुकाने लॅाकडाऊनध्ये बंद होती. त्यामुळे व्यवसाय ठप्प होता. असे असतांनाही दुकानदारांना भाड्याचा भुर्रदंड सहन करावा लागणार होता. ही बाब लक्षात घेता पालिकेने एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे भाडे माफ करण्याचा निर्णय देखील घेतला. त्यामुळे लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  
डॅा.बाबासाहेबांचा पुतळा
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरात आणखी   एक पुर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. शहरातील पालिका हद्दीतील सर्व्हे नंबर २१५-१ मधील प्लॅाट नंबर २८ च्या खाजगी जागेवर पुतळा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडे ना हरकत दाखल्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर चर्चा  होऊन निर्णय घेण्यात आला.
विविध विषयांवर चर्चा
सभेत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात पालिका हद्दीतील मालमत्तांचे चतुर्थ वार्षीक कर अकारणी  अर्थात जनरल रिव्हीजन करण्यास मंजुरी देण्यात आली. भुयारी गटार योजनेच्या संकलन व्यवस्थेचे देखभाल दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक मंजुर करण्यासह इतर विषयांना मंजुरी देण्यात आली.  

Web Title: No increase in house rent in Nandurbar this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.