शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही, स्वार्थासाठी राज्य वाऱ्यावर", बाळासाहेब थोरातांची टीका

By मनोज शेलार | Updated: August 12, 2022 20:07 IST

Balasaheb Thorat: स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.

- मनोज शेलार  नंदुरबार : मनापासून एकत्र न येता केवळ स्वार्थासाठी एकत्र आल्यावर काय होते हे भाजप-शिंदे गटाच्या सरकारच्या काराभारावरून लक्षात येते. ४० दिवस मंत्रिमंडळ नाही, मंत्रिमंडळ झाले तर खातेवाटप नाही अशी परिस्थिती आहे. स्वार्थासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य वाऱ्यावर सोडल्याची टीका कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नंदुरबारात बोलताना केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कॉंग्रेसतर्फे नंदुरबारात पदयात्रा काढून मेळावा घेण्यात आला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बाळासाहेब थोरात बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत बोलताना त्यांनी सांगितले, शिवसेनेने काँग्रेससोबत चर्चा करणे आवश्यक होते. या पदासाठी कॉंग्रेसचीही मागणी होती. परंतु शिवसेनेने परस्पर निर्णय घेतला. आघाडी असताना ही बाब खटकणारी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात प्रथमच बिनखात्याचे मंत्री स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करणार आहेत तर अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना झेंडावंदन करावे लागणार आहे. राज्य सरकार अस्तित्वात असताना अशी वेळ येणे ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरणार असल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार