शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

निवा:यासाठी नंदुरबारातील दुर्गम भागात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील दुर्गम भागातील आदिवासी तसेच दारिद्रय रेषेखालील अनुसूचीत जाती-जमाती प्रवर्गातील लाभाथ्र्याचे घरकुलांचे स्वप्न अपूर्ण राहते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आह़े दुर्गम भागातील लाभाथ्र्याना बँक  खाते उघडण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत़ त्यामुळे साहजिकच त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे अनुदान मिळत नसल्याचे सांगण्यात येत आह़े खर तर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारातील दुर्गम भागातील आदिवासी तसेच दारिद्रय रेषेखालील अनुसूचीत जाती-जमाती प्रवर्गातील लाभाथ्र्याचे घरकुलांचे स्वप्न अपूर्ण राहते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आह़े दुर्गम भागातील लाभाथ्र्याना बँक  खाते उघडण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत़ त्यामुळे साहजिकच त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांचे अनुदान मिळत नसल्याचे सांगण्यात येत आह़े खर तर अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत़ परंतु 21 व्या शतकातदेखील येथील आदिवासी बांधवांना निवा:यासाठी मोठा झगडा करावा लागत असल्याची स्थिती चिंताजनक आह़े आपल्या हक्काच्या घराचा लाभ मिळवण्यासाठी त्यांना मोठय़ा प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आह़े जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2017-2018 या आर्थिक वर्षासाठी 15 हजार 600 घरकुलांचे टार्गेट देण्यात आले आह़े त्यातील 12 हजार 210 घरांना ऑनलाईन मंजुरी देण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात आतार्पयत केवळ एकच घरकुल पूर्ण होऊ शकले आह़े या योजनेचा निधी पाच टप्प्यांमध्ये लाभाथ्र्याच्या बँक खात्यावर ‘डीबीटी’व्दारे देण्यात येत असतो़ त्यासाठी आधार कार्ड, बँक खाते क्रमांक/पावती पुस्तक व जॉबकार्ड आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असत़े परंतु धडगाव तसेच जिल्ह्यातील इतरही दुर्गम भागातील घरकुलांच्या लाभाथ्र्याना या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आह़े अनेक ठिकाणी लाभाथ्र्याचे बँक खाते उघडण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ करण्यात                    येत असल्याची भिषण स्थिती आह़े                   तर काही ठिकाणी योग्य मार्गदर्शनाचा अभाव दिसून येत आह़े त्यामुळे  ख:या-खु:या लाभाथ्र्यानाही आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित रहावे लागत असल्याची स्थिती                     आह़े अनेकांचे बँक खाते क्रमांक चुकीचेलाभाथ्र्याकडून घरकुल योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रस्ताव मागविण्यात येत असतात़ त्यासोबत आधार कार्ड व योजनेचा निधी डीबीटीव्दारे मिळावा यासाठी बँक खातेक्रमांक आवश्यक असतो़ परंतु अनेक वेळा लाभाथ्र्याकडून चुकीचा बँक खातेक्रमांक देण्यात येत आह़े  त्यामुळे साहजिकच प्रस्ताव नामंजुर होत आह़े यात लाभाथ्र्यासोबतच ग्रामीण विकास यंत्रणेच्या कर्मचा:यांचेही मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़ दुर्गम भागातील लाभाथ्र्यामध्ये आधिच अशिक्षीततेचे प्रमाण जास्त आहेत़ त्यातच घरकुलांच्या योजनांची कार्यवाही संपूर्णपणे ऑनलाईन झाली असल्याने ही सर्व पध्दत येथील लाभाथ्र्याच्या पचणी पडत नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे लाभार्थीदेखील घरकुलांच्या योजनांचा लाभ घेण्याबाबत उदासिनता दाखवित असल्याचे सांगण्यात येत आह़े