शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नऊ मतदान केंद्रांवर नर्मदेच्या अथांग पाण्यातून जावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 20:27 IST

दुर्गम भागातील मतदान केंद्र : एक दिवस आधी निघणार कर्मचारी

नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील नऊ मतदान केंद्रांवर सरदार सरोवरच्या अथांग पाण्यातून बार्ज अर्थात बोटीद्वारे निवडणूक कर्मचाऱ्यांना जावे लागणार आहे. अशा ठिकाणी मोबाईल रेंज राहणार नसल्यामुळे पोलिसांच्या वायरलेस सेटचा वापर संपर्काचे माध्यम म्हणून राहणार आहे.नंदुरबार लोकसभा मतदार संघातील अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके पुर्णपणे अतिदुर्गम भागातील आहेत. या तालुक्यातील नर्मदा काठावरील अनेक गावांमधील मतदान केंद्रात जाण्यासाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. अशा कर्मचाºयांना एक दिवस आधीच अशा केंद्रांवर मतदान साहित्यासह रवाना करावे लागते. नर्मदा काठावरील अनेक ठिकाणी शाळा किंवा अंगणवाडी इमारत अथवा ग्राम पंचायत कार्यालय नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे शेड तयार करून मतदान केंद्र तयार करावे लागत आहे.नर्मदा काठावरील नऊ मतदान केंद्रांमध्ये जाण्यासाठी निवडणूक कर्मचाºयांना थेट गुजरातमधील केवडीया कॉलनी येथे जावून तेथून सरदार सरोवरच्या अथांग पाण्यातून बार्जद्वारे अर्थात शासनाच्या बोटीद्वारे संबधीत नऊ केंद्रांवर जावे लागणार आहे. नर्मदा काठावर उतरल्यावर संबधीत गावांमध्ये जाण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेवून त्यांच्यासोबत निवडणुकीचे साहित्य घेवून संबधीत मतदान केंद्रावर जावे लागणार आहे.परतीचा प्रवास देखील तसाच राहणार असल्यामुळे मतदान झाल्यानंतर संबधीत साहित्य घेवून दुसºया दिवशी सकाळी संबधीत कर्मचारी मतदान यंत्र जमा करणार आहेत.वायरलेस सेट संपर्काचे माध्यमदुर्गम भागातील मतदान केंद्रात संपर्काचे साधन नसल्यामुळे अशा ठिकाणाहून तालुकास्तरावर किंवा जिल्हा मुख्यालयी संपर्क साधण्यासाठी पोलिसांच्या वायरलेस सेटची मदत घेतली जाणार आहे. गेल्या वेळी सॅटेलाईट फोनचा वापर करण्याचा प्रयोग झाला, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे यंदा वायरलेस सेटचाच वापर करण्यावर भर राहणार आहे.