शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

माजी नगराध्यक्षंसह नऊ जणांना कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 11:56 IST

तळोदा पिपल्स सोसायटी वाद : मुख्याध्यापकांना घरात घुसून मारहाणीचे प्रकरण

नंदुरबार : शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत वादात मुख्याध्यापक पदाचा पदभार घेण्याच्या कारणातून घरात घुसून हल्ला करणाऱ्या नऊ जणांना सश्रम कारावासाची शिक्षा शहादा न्यायालयाने सुनावली. शिक्षा झालेल्यांमध्ये तळोद्याचे माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्यासह नऊ जणांचा समावेश आहे.तळोदा येथील पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचा १२ वर्षांपासून संस्थेचा ताबा घेण्यावरून वाद सुरू होता. मे २०१० मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी प्रभाकर चौधरी यांना अध्यक्ष म्हणून घोषीत केले होते. त्यानुसार चौधरी यांनी किशोरसिंग गुलाबसिंग परदेशी यांना पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती दिली होती. दुसऱ्या गटाचे जितेंद्र लक्ष्मण माळी व इतरांना ते मान्य नव्हते. या वादातून १२ मे २०१० रोजी किशोरसिंग गुलाबसिंग परदेशी यांच्या तळोदा येथील घरात घुसून जमावाने त्यांना मारहाण केली होती. तलावारीनेही वार केले होते. महिलांच्या गळ्यातून साडेपाच तोळ्याचे मंगळसूत्र देखील जबरीने चोरल्याची फिर्याद किशोरसिंग परदेशी यांनी तळोदा पोलिसात दिली होती.त्यावरून जितेंद्र लक्ष्मण माळी, पंकज भालचंद्र राणे, निलेश धर्मदास माळी, गौतम आत्माराम शिरसाठ, सुशिल लक्ष्मण माळी, कुलदिप रमण राणे, विनोद रमण राणे, कल्पेश धर्मदास माळी, भरत बबनराव माळी, लक्ष्मण बबनराव माळी, सुजीत लक्ष्मण माळी, तुषार सुनील माळी व संजय बबनराव माळी यांच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करून पोलीस उपअधीक्षक एम.डी.आत्राम यांनी शहादा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायायाधिश पी.बी.नायकवाड यांच्या न्यायालयात हा खटला चालला. न्यायालयाने सर्व साक्षी, पुरावे लक्षात घेता शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.स्वर्णसिंह गिरासे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून फौजदार रामलाल साठे, हवालदार रवींद्र माळी होते. तपास अधिकारी, सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडित यांनी अभिनंदन केले.