नवापूर : दारु वाहून नेणाºया एका वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी झाले़ घटनेनंतर पोलीसांनी चालकावर कारवाई करत तीन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला़रविवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास नवापूरकडून आहवाकडे जाणाºया डब्ल्यू़ बी २० ए़ जी ९३६४ या वाहनाने नवापूरकडे येणाºया एमएच ३९ एए़ ३७३५ या दुचाकीला समोरुन धडक दिल्याने मोटारसायकलस्वार भिमराव सुरेश मोरे रा़रामजी नगर साक्री व मागे बसलेले प्रशांत मधुबन मोरे जखमी झाले़ अपघातातानंतर चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला घसरून चालक मोहंमद अली रोशन अली रा. सुरत हा देखील जखमी झाला. चारचाकी वाहनाच्या मागील भागातील बैठक व्यवस्था काढून तेथे देशी विदेशी बनावटीचे मद्य वाहुन नेले जात होते. गस्तीवर तैनात पोलीस पथकास घटनेची माहिती मिळताच त्यांनी देशी विदेशी बनावटीचे मद्य व वाहन मिळुन तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चारचाकी चालकाविरुद्ध नवापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला़ सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक पाटील व सहकारी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान अपघातातील जखमी भिमराव सुरेश मोरे यांनीही फिर्याद दिल्यानंतर कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला़ गुजरात राज्यात मंगळवारी तर महाराष्ट्रात २९ रोजी मतदान होणार आहे. मतदान जवळच असतांना अपघाताच्या निमित्ताने दारूची अवैध तस्करी पोलीसांनी हाणून पाडली. सीमावर्ती भागात वाहनांची कसुन तपासणी होत असतांनाही अवैधपणे देशी विदेशी दारूची वाहतुक होत असल्याचे समोर आले आहे़
नवापूरात दारु वाहून नेणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 12:11 IST