शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरात 32 हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:20 IST

पोलीस प्रशासनासमोर आव्हान : सतत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने भिती

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 29 : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले साई इन्व्हर्टर बॅटरी व मोबाइल दुकान रात्री 2 वाजेच्या सुमारास चोरटय़ांनी फोडले. यात तीन  नवीन मोबाईल तसेच दुरुस्तीसाठी आलेले 4 मोबाईल व दोन हजार  रुपये असे 32 हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला असल्याची माहिती आह़े नवापूर शहराच्या भर वस्तीत असलेले हे दुकान पोलीस स्थानकापासून केवळ 200 मीटर अंतरावर आहे. तरीदेखील दुकान फोडण्याचे धाडस चोरटय़ांनी केल्याने परिसरातील दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आह़े यामुळे पोलिसांपुढेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शहरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवडय़ात मंगलदास पार्क येथेही चोरटय़ांनी घर फोडले होते. तेथील रहिवासी श्री़ कोठावदे यांच्या घरातून  85 हजाराचा ऐवज चोरीस गेला होता. आता तर मेनरोडावर असेलेले साई इन्व्हर्टर बॅटरी व मोबाईल शॉप चोरटय़ांनी फोडले आहे. यापूर्वी या भागात अमिन मोबाइल शॉप या दुकानवरचे पत्रे तोडून चोरीचा प्रय} झाला होता. लगतच असलेल्या किराणा दुकानात दोन वेळा चोरी झाली होती. साई इन्व्हर्टर बॅटरी व मोबाइल दुकानात ही दुस:यांदा चोरी झाली आहे. या मार्गावरील व्यापारी व रहिवाशी 2014 पासून सीसीटीव्ही बसविण्याची मागणी करीत आहेत़ मात्र आज पर्यत या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावले गेले नसल्याने व्यापारी व रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांनी दुकानाचा पंचनामा केला असून दुकानाच्या मागील भागातील छतावरील दोन पत्रे उघडून चोरांनी दुकानात प्रवेश केला आहे. दुकानात चोरटय़ांच्या पायाचे ठसे उमटले आहे. या घटनेची फिर्याद दुकानदार अविनाश उदेसिंग पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.   शहरातील मंगलदास पार्क, जनता पार्क सारख्या उच्चभ्रु भागात बंद घरे फोडण्याचे व मोटार सायकली लंपास होण्याच्या घटना गतकाळात घडल्या आहेत. त्यामुळे चोरटय़ांनी पुन्हा आपले डोके वर काढले असल्याने पोलिसांपुढे समस्या निर्माण झाली आह़े तसेच चोरटय़ांना जेरबंद करण्याचे आव्हान निर्माण झाले   आह़े