भूषण रामराजे ।लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 12 : पाणीटंचाईमुळे चर्चेचा विषय ठरणा:या धडगाव तालुक्यात यंदा मस्त्यशेती चर्चेचा विषय ठरत आह़े काकर्दा ता़ धडगाव येथे कृषी विभागाच्या सहकार्याने तयार झालेल्या शेततळ्यात मस्त्यबीज टाकून रोजगाराचा नवा पर्याय स्थानिक युवकांसमोर उभा राहिला आह़े काकर्दा परिसरात गेल्या काही वर्षात शेतीसह इतर पूरक उपक्रमांवर शेतकरी भर देत आहेत़ आंबा आणि पेरू बागांनी बहरलेल्या या भागात दोन शेतक:यांनी वैयक्तिक शेततळे उभारली होती़ यात ऑगस्ट 2017 मध्ये मस्त्यबीज टाकले होत़े या बीजाचे मोठय़ा माशांमध्ये रूपांतर झाले असून यातून स्थानिकांना रोजगाराचा नवा मार्ग सापडला आह़े येत्या आठ दिवसात येथून काढलेल्या माशांची विक्री होणार असल्याने स्थानिकांसोबत परराज्यातील व्यापारी मासे खरेदीसाठी उत्सुक आहेत़ काकर्दा येथील गोटय़ा हुण्या पावरा आाणि वसंत बिंद्या पाडवी या दोघा शेतक:यांनी कृषी विभागाच्या राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता़ यानुसार या शेतक:यांना 5़56 लाख रूपयांचे अनुदान देण्यात आले होत़े यातून काकर्दे गावशिवारात दोघांनी 44 बाय 44 मीटर लांबी आणि रूंदीचा खड्डा करून त्यावर 500 मायक्रॉन रिइनफोर्स एडीपीई जिओमेब्रेन प्लास्टिक कागद अंथरला होता़ कागद टाकल्यानंतर शेतक:यांनी जलसाठा करून घेतला होता़ या तळ्यांच्या माध्यमातून मस्त्यव्यवसाय व्हावा म्हणून मध्यप्रदेशातील राजपूर येथून 12 हजार मस्त्यबीज आणून दोन्ही शेतक:यांनी तलावात टाकले होत़े गोटय़ा पावरा आणि वसंत पाडवी यांनी मस्त्यबीज टाकल्यानंतर त्याला वेळावेळी खाद्यपुरवठा केला होता़ यातून गेल्या आठ महिन्यात रोहू, कटला आणि मुगल प्रजातीचे सात किलो वजनार्पयतचे मासे तयार झाले आहेत़ ऐन उन्हाळ्यात माशांची आवक कमी असताना येथून मस्त्योत्पादन होणार असल्याने मागणीही वाढली आह़े काकर्दा येथे फुललेल्या मस्त्यशेतीची माहिती मिळत असल्याने धडगाव ते शहादा दरम्यान प्रवास करणारे नोकरदार येथून मासे खरेदी करून घेऊन जात आहेत़ एकीकडे कृषी विभागाकडून फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असताना दुसरीकडे मात्र शासनाच्या मस्त्य संवर्धन विभागाकडूनच शेतक:यांची थट्टा गेली आह़े शेततळे तयार झाल्यानंतर मस्त्यबीज खरेदी आणि खाद्यसाठी अनुदान मिळावे म्हणून वेळावेळी धुळे आणि नंदुरबार येथील मस्त्यसंवर्धन अधिकारी यांच्याकडे चकरा मारूनही त्यांच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवण्यात आली़ यामुळे घाबरून न जाता दोन्ही शेतक:यांनी स्वखर्चाने राजपूर (म़प्र) येथून मस्त्यबीज आणून तळ्यात टाकल़े खाद्याचे अनुदानही संबधित विभागाने न दिल्याने त्याचाही खर्च आठ महिन्यांपासून शेतकरी करत असल्याचे सांगण्यात आल़े
काकर्दा येथे शेततळ्यातून मिळाली रोजगाराची नवी दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 13:15 IST