शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण काढलेल्या जागेवर उपाययोजनांची गरज : शहादा पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : बसस्थानक परिसरात अतिक्रमण काढलेल्या जागेवर पालिका प्रशासनाने अजून कोणताही प्रकल्प न राबविल्याने तसेच अतिक्रमणधारकांना पालिकेने अद्याप पर्यायी जागा न दिल्याने तेथे पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेथे पुन्हा अतिक्रमण झाल्यास अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने केलेला प्रचंड खर्च पाण्यात जाणार असल्याचे मोकळ्या झालेल्या या जागेवर पालिकेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : बसस्थानक परिसरात अतिक्रमण काढलेल्या जागेवर पालिका प्रशासनाने अजून कोणताही प्रकल्प न राबविल्याने तसेच अतिक्रमणधारकांना पालिकेने अद्याप पर्यायी जागा न दिल्याने तेथे पुन्हा अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेथे पुन्हा अतिक्रमण झाल्यास अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने केलेला प्रचंड खर्च पाण्यात जाणार असल्याचे मोकळ्या झालेल्या या जागेवर पालिकेने पार्कीग झोन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहादा शहरात विशेषत: बसस्थानक परिसरात रहदारीची समस्या गंभीर झाली आहे. बसस्थानक परिसरातील अतिक्रमणामुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली होती. रहदारी सुरळीत होण्यासाठी पालिकेने दिवाळीपूर्वी मोठा फौजफाटा घेवून बसस्थानक परिसर व डोंगरगाव रोडवरील अतिक्रमण काढले होते. या भागातील अतिक्रमण काढले गेल्याने रस्ते मोकळे झाल्यामुळे ब:याच प्रमाणात रहदारी सुरळीत झाली असली तरी शहरात कुठेही पार्क्ीग झोन नसल्याने संपूर्ण शहरभर जागा मिळेल तेथे वाहने उभी राहत असल्याने रस्त्यात उभ्या राहणा:या या वाहनांमुळे रहदारीची कोंडी होते. वाहनचालक सर्रास तहसील कार्यालय, नगरापालिका, बसस्थानक परिसरात वाहने उभी करतात. शहरात कुठेही पार्कीग झोन नसल्यामुळे पार्क्ीगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याकरीता शहरात विशेषत: बसस्थानक परिसरात पार्क्ीग झोन तयार करणे आवश्यक आहे. बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी काही महिन्यांपूर्वी पालिकेने तेथील अतिक्रमणे काढून जागा मोकळी केली होती. परंतु त्यानंतर लगेचच ती जागा ताब्यात घेवून तेथे पालिकेने कोणताही प्रकल्प न राबविल्यामुळे तसेच तेथील अतिक्रमीतांना व्यवसायासाठी पर्यायी जागा न दिल्याने त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होवून रहदारीची समस्या ‘जैसे थे’ होवू शकते. त्यामुळे पालिकेने आता अतिक्रमण काढून मोकळ्या झालेल्या जागेवर त्वरित पार्क्ीग झोन तयार करणे आवश्यक आहे. बसस्थानकाजवळील या मोकळ्या जागेवर पार्कीग झोन झाल्यास शहरातील पार्कीगची मोठी समस्या सुटून तेथे अतिक्रमणाची समस्याही कायमची निकालात निघेल.